शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात चोरी
By नामदेव मोरे | Published: September 15, 2022 06:28 PM2022-09-15T18:28:05+5:302022-09-15T18:30:14+5:30
१३ सप्टेंबरला चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तळमजल्यावरील राजकीय कार्यालय व पहिल्या मजल्यावरील पतसंस्थेच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न केला.
नवी मुंबई - शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे. चोरट्यांना कार्यालयात मौल्यवान वस्तू न मिळाल्यामुळे त्यांनी डीव्हीआर चोरून तेथून पलायन केले आहे. वाशी सेक्टर ६ मधील मार्केटजवळ जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्या शिवसंकल्प पतपेढीचे व राजकीय कार्यालय आहे.
१३ सप्टेंबरला चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तळमजल्यावरील राजकीय कार्यालय व पहिल्या मजल्यावरील पतसंस्थेच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही ठिकाणी पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून पलायन केले. चोरी चोरट्यांनी केली की कोणी राजकीय हेतूने हा प्रकार केला आहे याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विठ्ठल मोरे यांच्या तक्रारीवरून वाशी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.