मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या त्रिकुटाला अटक, चोरीचे ८ मोबाईल हस्तग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:04 PM2023-09-16T17:04:50+5:302023-09-16T17:08:03+5:30
पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ९ गुन्ह्यांची उकल करून चोरीचे ८ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा :- मोबाईलच्या जबरी चोरीसह इतर चोरी करणाऱ्या त्रिकुटाला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ९ गुन्ह्यांची उकल करून चोरीचे ८ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
वालीवच्या मन्नत गल्ली येथे राहणारा मोहम्मद साजिद मोहम्मद अली (२४) हा तरुण २७ ऑगस्टला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास वालीवच्या विठ्ठल मंदिरा समोरून मित्र आलम याच्यासोबत मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी चालत जात होता. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील २३ हजारांचा ओपो मोबाईल जबरीने खेचून पळून गेले. वालीव पोलिसांनी ९ सप्टेंबरला जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन आरोपी मोहम्मद साहिल उर्फ चिरा जमाल अहमद चुरीहार (१९), अल्फाझ ईलीयास अली शेख (२४) आणि आकाश गोविंद रेडडी (२४) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपीकडे तपास केल्यावर वालीव व पेल्हार पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील ९ गुन्ह्यांची उकल केली आहे. गुन्हयातील चोरीस गेलेले ८ मोबाईल व आरोपींनी गुन्हयात वापरलेली दुचाकी असा १ लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.