जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात

By विजय.सैतवाल | Published: March 9, 2024 11:01 PM2024-03-09T23:01:07+5:302024-03-09T23:01:25+5:30

सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच : २० हजार घेताना रंगेहाथ पकडले

The two clerks were caught while taking bribes in the Collectorate office area | जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच लाच घेताना दोघे लिपिक जाळ्यात

जळगाव : ग्रामपंचायत सदस्याविषयी असलेल्या तीन अपत्याच्या तक्रारीसंदर्भात सकारात्मक अहवाल देण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाचे दोन लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. महेश रमेशराव वानखेडे (३०, मूळ रा. नेर, जि. यवतमाळ) व समाधान लोटन पवार (३५, रा. पारोळा) अशी या लिपिकांची नावे आहेत. वानखेडे याने सांगितल्यावरून २० हजार रुपये स्वीकारताना पवार याला पथकाने रंगेहात पकडले.

तक्रारदार हे जळगाव तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत २०२१मध्ये निवडणुकीत निवडून आले. त्यांच्याविरुद्ध तीन अपत्य असल्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात ग्रामपंचायत विभागातील लिपिक महेश वानखेडे याने तक्रारदाराला सकारात्मक अहवाल देण्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने शनिवार, ९ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने प्रदीप पोळ या पथकाने सापळा रचून समाधान पवार यास ३० हजारांपैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The two clerks were caught while taking bribes in the Collectorate office area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.