काकाने पुतण्याला आणि सख्ख्या सुनेला एका घरात पकडले; पळालेले दोघे पुन्हा परतले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:39 PM2023-09-07T15:39:41+5:302023-09-07T15:40:41+5:30

आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी करत आहेत. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

The uncle caught the nephew and his daughter-in-law in a house while doing sex; The two who ran away returned again and killed him | काकाने पुतण्याला आणि सख्ख्या सुनेला एका घरात पकडले; पळालेले दोघे पुन्हा परतले अन्...

काकाने पुतण्याला आणि सख्ख्या सुनेला एका घरात पकडले; पळालेले दोघे पुन्हा परतले अन्...

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात अवैध शरीरसंबंधांचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पुतण्याने व सख्ख्या सुनेने सासऱ्याला मारहाण केली. यात सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण होते. मृताच्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. शांतता राखण्यासाठी गावात पोलीस तैनात करण्यात आले होते. 

आरोपींचा शोध सुरु आहे. राजकुमार उर्फ कोइल हे सुनेची बदललेले वागणे पाहून तिचा पाठलाग करत गावाशेजारील एका घरात गेले होते. तिथे त्यांना भावाचा मुलगा आणि त्यांची सख्खी सून अश्लिल गोष्टी करताना, नको त्या अवस्थेत सापडले. यावरून त्यांनी दोघांना ओरडण्यास सुरवात केली. यामुळे नाराज झालेल्या पुतण्या आणि सुनेने त्यांच्यावर हल्ला केला. खाली पाडून छातीवर ठोसे हाणले. यानंतर तिथून पळून गेले. 

यानंतर राजकुमार यांचा भाऊ जोखू, पुतण्या आणि सून परत आले आणि त्यांच्यावर परत हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले राजकुमार हे जमिनीवर पडले आणि बेशुद्ध झाले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजकुमार यांच्या शरीरावर जखमा नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी करत आहेत. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: The uncle caught the nephew and his daughter-in-law in a house while doing sex; The two who ran away returned again and killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.