चलान कापणाऱ्या वाहतूक पोलिसांवर घातली गाडी अन् तरुण झाला रफूचक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:13 PM2022-03-07T22:13:29+5:302022-03-07T22:14:10+5:30
Traffic police News : काही अंतर गेल्यावर त्यालाही थांबवण्यात आले. मात्र यानंतर पुन्हा आरोपींनी दोन्ही हवालदारांना मारहाण केली आणि बाचाबाची झाली.
उत्तर दिल्लीतील मॉरिस नगर भागात वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या कारला हाताच्या इशाऱ्याने थांबण्यास सांगितले. आरोपींनी कार थांबवण्याऐवजी गाडीचा वेग वाढवला. आरोपीने पहिल्या दोन हवालदारांना गाडीने कट मारून खाली पाडले. यानंतर तो थेट एएसआयला टक्कर मारून पळून गेले. दोन हवालदारांनी होंडा सिटी कारमधून आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही अंतर गेल्यावर त्यालाही थांबवण्यात आले. मात्र यानंतर पुन्हा आरोपींनी दोन्ही हवालदारांना मारहाण केली आणि बाचाबाची झाली.
जखमींना जवळच्या कश्मिरे गेट येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे एएसआय विनय (52) यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाकी सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. कारचा नंबर नोएडाचा सांगितला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सब्जी मंडी ट्रॅफिक सर्कलमध्ये एएसआय एन श्रीधर, एएसआय विनय, हवालदार राजीव कुमार, कॉन्स्टेबल मनोज आणि कुणाल यांच्यासह गुरु तेग बहादूर मार्गावर तैनात होते. दौलतराम कॉलेजच्या लाल दिव्यापासून सुमारे 200 मीटर आधी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दुपारी 12.45 च्या सुमारास या लोकांना पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार जवळ येताना दिसली. कारच्या खिडक्या काळ्या फिल्मने झाकल्या होत्या. गाडीची नंबर प्लेटही फॅन्सी होती. हे पाहून त्याला थांबण्याचा इशारा केला. बाजूच्या हवालदार मनोज आणि हवालदार राजीव यांना मारहाण करत आरोपी फरार झाले.
दरम्यान, एएसआय विनय याने कारसमोर येऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना थेट धडक दिली. त्यानंतर आरोपी फरार होऊ लागले. एएसआय विनय गंभीर जखमी झाले. कॉन्स्टेबल मनोज आणि कुणाल यांनी होंडा सिटी कारचा पाठलाग करणार्या वाहनधारकाच्या गाडीतून सुरू केला. रामजस कॉलेजजवळही गाडी थांबवण्यात आली.
मनोज आणि कुणाल कारसमोर येताच आरोपींनी त्यांनाही चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी मॉल रोडच्या दिशेने पळ काढला. दोन्ही पोलीस थोडक्यात बचावले. जखमी जवानांना खासगी कारच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे एएसआय विनय यांच्या डोक्याला, खांद्यावर आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. एएसआय एन श्रीधर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीच्या गाडीचा क्रमांक नोंदवण्यात आला आहे. नंबर नोएडाचा आहे. त्याआधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.