'...तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही'; पीडितेच्या वडिलांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 07:05 PM2023-06-07T19:05:18+5:302023-06-07T19:07:17+5:30

मूळची अकोला येथील रहिवासी असलेली १८ वर्ष २ महिन्याची तरुणी सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहण्यास होती.

The victim girl's father has demanded that a case should be registered against the officials of the hostel. | '...तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही'; पीडितेच्या वडिलांची भूमिका

'...तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही'; पीडितेच्या वडिलांची भूमिका

googlenewsNext

मुंबई: चर्नीरोड येथील एका वसतिगृहाच्या खोलीत १८ वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. सुरक्षा रक्षकानेच तरुणीवर बलात्कार करत तिची गळा दाबून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हत्येनंतर सुरक्षा रक्षकाने लोकल समोर येत आयुष्य संपविले आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया विरुद्ध हत्येसह बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

मूळची अकोला येथील रहिवासी असलेली १८ वर्ष २ महिन्याची तरुणी सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहण्यास होती. तिचे वडील पत्रकार आहे. ती वांद्रे येथील एका नामांकित कॉलेज मध्ये पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत सापडला. या घटनेने वसतीगृहात एकच खळबळ उडाली. 

घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मात्र जोपर्यंत हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयत मुलीच्या वडिलांनी घेतली आहे. तर वसतिगृहाच्या अधीक्षक वर्षा अंधारे यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे. वसतिगृहात आम्हाला रात्रीच्या वेळेस २ सुरक्षारक्षकांची गरज लागते, परंतु गेल्या वर्षी सरकारकडून सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात करण्यात आली आणि त्यामुळे आम्ही सदर व्यक्तीला सपोर्ट स्टाफ म्हणून ठेवले असल्याचं वर्षा अंधारे म्हणाल्या.       

दोन दिवसांत जाणार होती गावी

तरुणी मूळची अकोला येथील रहिवासी असून दोन ते तीन दिवसांत गावी जाणार होती. तसे तिकीट काढले असल्याची माहिती मिळत आहे.  अशी आली घटना उघडकीस अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी वसतीगृहात राहणाऱ्या तरुणीचा दरवाजा लॉक असून मुलगी कुठे आहे याबाबत काहीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, खोलीतच मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला. तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसतिगृहातील संशयास्पद व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: The victim girl's father has demanded that a case should be registered against the officials of the hostel.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.