सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना दिव्यात मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 20:38 IST2022-03-20T20:34:26+5:302022-03-20T20:38:10+5:30
Lavni dancer Vijaya palav beaten : महिलांच्या दोन गटात झालेल्या वादावादीतून राज्य पुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दिव्यात घडली.

सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना दिव्यात मारहाण
मुंब्रा - इमारतीच्या मेंटेनन्सची वाढवलेली रक्कम तसेच घरामध्ये केलेल्या अंतर्गत कामाच्या वादामधून महिलांच्या दोन गटात झालेल्या वादावादीतून राज्य पुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दिव्यात घडली.
त्या पश्चिम भागातील सोनू प्लाझा या इमारतीमध्ये रहातात त्या इमारतीचा मेंटेनन्स विकासक जमा करतो.त्याने तो ८०० रुपयांवरुन १५०० रुपये केला. याचा जाब विचारण्यासाठी पालव काही महिलांसह गेल्या होत्या. त्यावेळी विकासकाने त्याला न विचारता घरातील अंतर्गत काम कसे केले अशी विचारणा त्यांच्याकडे केली. यावेळी विकासक आणि पालव यांच्याकडून आलेल्या महिलांमध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली.
यात जखमी झालेल्या पालव यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) गिताराम शेवाळे यांनी लोकमतला दिली.