पत्नीनेच घातला कॅप्टन पतीला गंडा, विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 08:38 IST2023-01-04T08:37:41+5:302023-01-04T08:38:10+5:30
सीबीडी येथे राहणाऱ्या कॅप्टनसोबत हा प्रकार घडला. त्यांचा २००३ मध्ये प्रेमविवाह झाला असून, लग्नानंतर ते वाशीत राहायला होते.

पत्नीनेच घातला कॅप्टन पतीला गंडा, विवाहबाह्य संबंध उघड झाल्याने प्रकार
नवी मुंबई : विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्याने पतीने घटस्फोटासाठी अर्ज करताच पत्नीने घरासह दागिने हडप केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिपिंग कंपनीत कॅप्टनपदावरील पतीने पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरून पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सीबीडी येथे राहणाऱ्या कॅप्टनसोबत हा प्रकार घडला. त्यांचा २००३ मध्ये प्रेमविवाह झाला असून, लग्नानंतर ते वाशीत राहायला होते. यादरम्यान कामानिमित्त ते अनेक महिने वेगवेगळ्या देशात असायचे. यादरम्यान त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एका पुरुषासोबत संबंध होते. परदेशात असताना पतीने विरंगुळ्यासाठी कम्प्युटरची हार्डडिस्क सोबत नेली असता त्यामधील फोटोवरून हा प्रकार समोर आला. त्यामुळे गतवर्षी या कॅप्टन पतीने पत्नीसोबत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यामुळे पत्नीने त्यांचा फ्लॅट प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या नावे केल्याचा पतीचा आरोप आहे.