धक्कादायक! पतीने पैसे चोरल्याचा आळ घेतल्याने पत्नीने स्वत:ला घेतले पेटवून, उपचारापूर्वीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 09:42 PM2022-03-09T21:42:20+5:302022-03-09T21:43:30+5:30
Crime News: खिशातील पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरल्याचा आळ पतीनं पत्नीवरच घेतला. पण हे सहन न झाल्यानं पत्नीनं अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला.
कोयनानगर - खिशातील पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरल्याचा आळ पतीनं पत्नीवरच घेतला. पण हे सहन न झाल्यानं पत्नीनं अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर विभागातील ढाणकल या गावात घडलीय. पोलिसांनी पतीला याप्रकरणी बेड्या ठोकल्यात.
याबाबत अधिक माहिती अशी, कोयनानगर विभागातील ढाणकल येथील सचिन मनोहर कदम (वय ३२) याच्या खिशातून शनिवार दि. ५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता काही पैसे व तंबाखूजन्य पुडी चोरीला गेली. त्यावेळी चोरीचा आळ त्यानं पत्नी पल्लवी कदम (वय २६ ) हिच्यावरच घेतला. कोणी पैसे चोरले असे त्याने विचारत तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. पल्लवीच्या केसांना धरून त्यानं फरफटत बाहेर आणलं.
त्यानंतर त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊ, अशी धमकी दिली. मात्र, पतीचे हे वागणे मनाला न पटल्याने पल्लवीनेच या वादावादीनंतर काहीवेळातच अंगावर राॅकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतलं. यात पल्लवी गंभीर भाजून जखमी झाली. तिला तातडीने पाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी आता पती सचिन कदम याला अटक केली आहे. कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.