प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 15:38 IST2022-07-22T15:37:11+5:302022-07-22T15:38:27+5:30
Murder Case : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा आपली पत्नी किर्ती सोबत वाकड परिसरातील भुजबळ वस्तीमधील येळवंडे एम्पायर येथे राहत होता.

प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून केली हत्या
पिंपरी : प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२०) सायंकाळी वाकडमधील भुजबळ वस्ती येथे दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेच्या मामीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत्यू महिलेचे नाव किर्ती अशिष भोसले (वय १९) असे असून पोलिसांनी आरोपी आशिष भोसले (वय २३, रा. सासवड, सध्या- येळवंडे एम्पायर, भुजबळ वस्ती, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा आपली पत्नी किर्ती सोबत वाकड परिसरातील भुजबळ वस्तीमधील येळवंडे एम्पायर येथे राहत होता. त्याचे ऑफीसमध्ये असलेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामध्ये किर्ती अडथळा ठरत असल्याने बुधवारी आशिष याने किर्तीला शारिरीक मानसिक त्रास देत मारहाण करून ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो घराला कुलुप लावून पळून गेला, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.