महिलेने मंत्रालयाबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्न, म्हणाली... पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:39 PM2022-03-04T20:39:21+5:302022-03-04T20:51:27+5:30
Suicide Attempt : मिळालेल्या माहितीनुसार, महिला रॉकेल घेऊन मंत्रालयाबाहेर पोहोचली होती. तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी तिला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे महिलेने सांगितले.
मुंबई - एका महिलेने मंत्रालयाबाहेर तिच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला रॉकेल घेऊन मंत्रालयाबाहेर पोहोचली होती. तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी तिला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे महिलेने सांगितले.
विक्रोळी पार्क शहरातील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय महिलेने सांगितले की, ती निर्दोष आहे आणि तिच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता महिलेने स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचाप्रयत्न केला. मात्र तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला वाचवून ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे तिच्याविरुद्ध आयपीसी कलम 309 अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
याआधीही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील मंत्रालयाबाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने तिने मुंबईत येऊन मंत्रालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
A 60-yr-old woman poured kerosene oil on herself & tried to set herself ablaze at gate of Mantralaya in Mumbai last evening alleging that she has been framed by Police in a case. She demanded that action be taken against the concerned Police officer & FIR against her be cancelled
— ANI (@ANI) March 4, 2022
महिलेने वारंवार तक्रार केली
पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महिलेने सांगितले. उलट पोलिसांनी महिलेवर आरोप केले. या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली. मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.