पतीच्या कमाईवर महिला नव्हती आनंदी, गळा आवळून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:02 PM2022-03-02T19:02:28+5:302022-03-02T19:03:40+5:30
Murder Case : पुढे तिने सांगितले की, तिला तिचा मुलगा अनिल कुमार बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एका महिलेने आपल्या 34 वर्षीय पतीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. पतीच्या कमी उत्पन्नामुळे ती महिला नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कोतवाली पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी, उगमराज सोनी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मंजू ही महिला पती अनिलच्या कमी उत्पन्नामुळे नाराज होती. या कारणावरून तिचा त्याच्याशी अनेकदा वाद व्हायचा. एसएचओने सांगितले की, हे जोडपे दारूचे सेवन करायचे आणि अनेकदा मारहाण करायचे.
पोलीस महिलेची चौकशी करत आहेत
पोलीस ठाण्याचे प्रभारी उगमराज सोनी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा आढावा घेतला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. त्याने सांगितले की, अनिलच्या आईने मंजू या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंजू हिला ताब्यात घेतले असून ती 30 वर्षांची आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे एसएचओने सांगितले. याप्रकरणी मंजू या महिलेची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याला दारूचे व्यसन होते आणि त्यांच्यात घरगुती वाद होता. "आम्ही पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे," असे पोलिसांनी सांगितले. पीडितेची आई कुंती जयराम या महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घराच्या पहिल्या मजल्यावर धाव घेतली. पुढे तिने सांगितले की, तिला तिचा मुलगा अनिल कुमार बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.