मदतीसाठी तासन् तास ओरडत होती महिला, चाकूचा धाक दाखवून केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:37 PM2022-04-18T16:37:44+5:302022-04-18T16:38:37+5:30
Rape Case : चौकशी केल्यानंतर आरोपीस रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोखरण: जैसलमेर जिल्ह्यातील लाठी भागातील केरलिया गावानजीक असलेल्या झोपडीत स्वयंपाक करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला लाठी पोलिसांनीअटक केली आहे.
चौकशी केल्यानंतर आरोपीस रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी एका व्यक्तीने लाठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पीडितेचे सासऱ्याने सांगितले की, 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो, त्याची पत्नी आणि मुलगा नळावर काम करत होते. यादरम्यान नागौर जिल्ह्यातील मेड़तासिटी रेण येथील सुखाराम याचा मुलगा डुंगराराम हा तिच्या झोपडीत घुसला आणि सून एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
तिने मदतीसाठी खूप आरडाओरडा केला, मात्र सिंचन कंपनामुळे आवाज ऐकू आला नाही. जवळच पडलेला चाकू सुखारामने उचलला आणि सुनेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सून घाबरली. यानंतर सुखारामने तिचे कपडे फाडून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. निघताना ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
सुनेने हा संपूर्ण प्रकार सासूला सांगितला. जाब विचारला असता आरोपी मारामारी करू लागला. आरोपीने सदर व्यक्तीस पकडले असता त्याची पत्नी बचावासाठी आली. त्यावेळी आरोपीने तिच्यावर दगडाने मारहाण केली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लाठीचे पोलीस अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक भंवरसिंह नाथवत यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरेंद्र चौधरी यांच्या सूचनेनुसार भीमराव सिंग सायबर सेलचे पथक तयार करण्यात आले. केरालिया गाव आणि आजूबाजूचा परिसर येथे शोध घेतला गेला. सायबर सेलच्या मदतीने आरोपीला केरालिया गावाजवळून अटक करण्यात आली असून चौकशीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.