गायीला त्रास देणाऱ्याला हटकले म्हणून महिलेला दगड मारत जखमी केले !
By गौरी टेंबकर | Published: January 29, 2024 04:30 PM2024-01-29T16:30:27+5:302024-01-29T16:30:45+5:30
पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
मुंबई: गाईला त्रास देणाऱ्याला हटकलं म्हणून महिलेवर दगडफेक करण्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात घडला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
तक्रारदार संजय यादव हे मालाडच्या मॉलमध्ये हाउसकीपिंगचे काम करतात. त्यांनी वाकोला पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २८ जानेवारी रोजी उशिरा रात्री ते त्यांच्या घरात झोपले असताना त्यांचे तबेला चालक भाऊ इंदल यांच्या पत्नी मंजू यादव त्याठिकाणी आल्या. एक अनोळखी २५ वर्षाचा इसम त्यांच्या तबेल्यातील गायीच्या गुप्तांगाला हात लावत तिचा छळ करताना त्यांना दिसला. गाय वेदनेने ओरडत असल्यामुळे नेमके काय झाले हे यादव त्याठिकाणी पाहायला गेल्या.
तेव्हा त्यांना पाहून तो इसम गावदेवी बीट चौकीच्या दिशेने पळून गेला असे संजयना त्यांच्या वहिनीने सांगितले. त्याने जाताना खाली पडलेला दगड यादवच्या दिशेने भिरकावला. जो त्यांच्या डाव्या हाताला आदळून त्यांना मुका मार लागला. याप्रकरणी संजय यांनी वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२४ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१)(ए) व ११(१)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.