ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सोनसाखळी चोरणाऱ्या रंगाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 03:53 PM2021-10-03T15:53:59+5:302021-10-03T15:54:09+5:30
कासारवडवली पोलिसांची कारवाई: एक लाखांची सोनसाखळीही हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडवरील एका घरात पेंटींगचे काम करतांनाच रामचंद्र दोमरे (६७) यांच्या घरातील कपाटातून ४० ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबविणाºया प्रेमचंद कुमार केदार सिंग (२६, पेंटर, रा. इंदीरापाडा, पातलीपाडा, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाखांची ही सोनसाखळीही हस्तगत करण्यात आली आहे.
घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्कच्या समोरील बंगला क्रमांक दोनमधील रहिवाशी दोमरे यांच्या घरातून २९ सप्टेंबर २०२१ रोजी सोनसाखळी लांबविण्यात आली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांचे एक पथक त्यासाठी नेमले होते. तपासादरम्यान, दोमरे यांनी संशय व्यक्त केलेल्या प्रेमचंदकुमार सिंग याला पातलीपाडा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या चोरीची कबूली दिली. त्याला ३० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
ठाणे न्यायालयाने त्याला २ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच दरम्यान त्याच्याकडून चोरीतील एक लाखांची ४० ग्रॅम वजनाची सोनसाखळीही जप्त केली. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार आणि पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश काळदाते आणि सहायक पोलीस निरीक्षक पालवे आदींच्या पथकाने मोठया कौशल्याने हा तपास केला.