सुपारी थुंकतो म्हणत, दिड लाखांचे दागिने घेऊन पसार; सोनाराची सांताक्रुज पोलिसात तक्रार

By गौरी टेंबकर | Published: September 11, 2023 05:55 PM2023-09-11T17:55:04+5:302023-09-11T17:55:10+5:30

तक्रारदार चेतन जैन (३५) यांचे सांताक्रुज पश्चिमच्या एमजी रोड याठिकाणी आशिष ज्वेलर्स नावाने दुकान आहे.

Theft at a gold and silver shop in Santacruz, Mumbai | सुपारी थुंकतो म्हणत, दिड लाखांचे दागिने घेऊन पसार; सोनाराची सांताक्रुज पोलिसात तक्रार

सुपारी थुंकतो म्हणत, दिड लाखांचे दागिने घेऊन पसार; सोनाराची सांताक्रुज पोलिसात तक्रार

googlenewsNext

 

मुंबई: सोनाराच्या दुकानात जाऊन एका इसमाने खरेदी करण्याचा बहाणा करत एकूण दिड लाख रुपये किंमतीची सोनसाखळी परिधान केली. नंतर तोंडातली सुपारी थुंकून येतो असे म्हणत ती घेऊन पसार झाला. याप्रकरणी सोनाराने सांताक्रुज पोलिसात धाव घेतल्यावर चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तक्रारदार चेतन जैन (३५) यांचे सांताक्रुज पश्चिमच्या एमजी रोड याठिकाणी आशिष ज्वेलर्स नावाने दुकान आहे. त्या दुकानांमध्ये ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास दोन अनोळखी इसम आले. त्यातील एकाने बहिणीच्या लग्नासाठी जवळपास अडीच लाख रुपयांचे दागिने खरेदी करायचे आहेत असे जैन यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी विविध दागिन्यांचे सेट काढून दाखवायला सुरुवात केली. तेव्हा त्या इसमाने एक सोन्याची चैन आणि ब्रेसलेट हवी असल्याचे सांगितले.

त्यापैकी चैन परिधान करत सुपारी खाल्ल्याने ती थुकुन येतो असे म्हणत दुकानाच्या बाहेर गेला आणि परत आलाच नाही. तेव्हा जैन यांनी त्याच्या सोबत आलेल्या मनीष तिवारीला (२३) याबाबत विचारले. मात्र त्यालाही काही कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. तसेच त्यांचा अजून एक साथीदार बाहेर ऑटो रिक्षा घेऊन थांबल्याचे तो म्हणाला. त्यालाही जैन यांनी बोलावून आणले. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश जैन (३४) असून तो राजस्थानचा राहणारा असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title: Theft at a gold and silver shop in Santacruz, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.