नालासोपाऱ्याच्या पेट्रोल पंपावरील चोरीचा गुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 07:21 PM2019-06-01T19:21:40+5:302019-06-01T19:23:57+5:30

तीन आरोपींना केली अटक, 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त

Theft case at nalasopara petrol pump is solved | नालासोपाऱ्याच्या पेट्रोल पंपावरील चोरीचा गुन्हा उघड

नालासोपाऱ्याच्या पेट्रोल पंपावरील चोरीचा गुन्हा उघड

Next
ठळक मुद्देपेट्रोल पंपावर 20 मेला मध्यरात्री लाखोंची चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली होतीतुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा चोरीचा गुन्हा उघड केला

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर 20 मेला मध्यरात्री लाखोंची चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा चोरीचा गुन्हा उघड केला असून तीन आरोपींसह 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर इंडियन ऑइल नावाचा पेट्रोल पंप असून  चोरांनी 20 मेच्या मध्यरात्री पंपाच्या कार्यालयाच्या मागच्या दिशेने जाऊन खिडकीची ग्रील तोडून तिजोरीत ठेवलेले 11 लाख 22 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून पसार झाले होते. तुळींज पोलिसांनी 21 मे ला गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मुंबईच्या विविध परिसरात चोरी करणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महावीर जोहर सिंग (32), गंगासिंग मनोहरसिंग कडेसा (35) आणि अजयन कारीयंबु पावूरयेडू (39) यांना पकडले असून तपासात चोरी केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी आरोपितांकडून 4 लाख 43 हजार रोख रक्कम आणि 1 लाख 50 हजार रुपयांची कार असा एकूण 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Theft case at nalasopara petrol pump is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.