कोरोना केअर सेंटरमध्ये मृताच्या दागिन्यांची चोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 01:50 AM2020-09-11T01:50:09+5:302020-09-11T01:50:15+5:30

दहिसर पूर्वकडील शैलेंद्रनगर येथे राहणाऱ्या सुलोचना गिरकर (७५) गेल्या आठवड्यात कांदरपाडा कोरोना सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाल्या होत्या.

Theft of dead jewelry at Corona Care Center? | कोरोना केअर सेंटरमध्ये मृताच्या दागिन्यांची चोरी?

कोरोना केअर सेंटरमध्ये मृताच्या दागिन्यांची चोरी?

Next

मुंबई : पालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत झालेल्या वृद्धेच्या अंगावरील दागिने पळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दहिसर पश्चिमेच्या कांदरपाडा येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

दहिसर पूर्वकडील शैलेंद्रनगर येथे राहणाऱ्या सुलोचना गिरकर (७५) गेल्या आठवड्यात कांदरपाडा कोरोना सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाल्या होत्या. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी याची माहिती कुटुंबीयांना दिली. तेव्हा त्यांचे नातू संकेत मेस्त्री तेथे पोहोचले. गिरकर यांच्या गळ्यात मंगळसूत्र होते आणि त्यांना कुटुंबीयांनी मोबाइलही दिला होता. दोन्ही गोष्टी न सापडल्याने संकेत यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी कुटुंबीय पोलीस ठाण्यात धाव घेणार असल्याचे समजते. याची विचारणा करण्यासाठी एमएचबी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Theft of dead jewelry at Corona Care Center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.