साकोली येथे दोन सराफ दुकानांसह पाच ठिकाणी चोरी, ५० लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 10:20 AM2021-08-06T10:20:23+5:302021-08-06T10:20:51+5:30

चोरट्यांनी सहा बुलेटसह बंदूकही पळविली

Theft at five places including two jewelry shops in Sakoli, Rs 50 lakh stolen | साकोली येथे दोन सराफ दुकानांसह पाच ठिकाणी चोरी, ५० लाखांचा ऐवज लंपास

साकोली येथे दोन सराफ दुकानांसह पाच ठिकाणी चोरी, ५० लाखांचा ऐवज लंपास

Next

साकोली(भंडारा) : चोरट्यांनी एकाच रात्री दोन सराफा दुकानांसह पाच ठिकाणी चोरी केल्याची घटना सकोली येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी ५० लाखांच्या मुद्देमालासह सराफा दुकानातून सहा बुलेट व बंदूक लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

सकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर रुपेश खेडीकर यांचे खेडीकर ज्वेलर्स आणि राजेश शहाणे यांचे पुष्पंम ज्वेलर्स आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही सराफा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली. चोरट्यांनी प्राथमिक अंजादानुसार ५० लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची माहिती आहे. तसेच खेडीकर ज्वेलर्समधून सहा बुलेट व बंदूक चोरुन नेली. या सोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या सुमन डेअरीतही चोरी झाली. तेथून चोरट्यांनी २२ हजार रोख लंपास केले. तसेच दोन टपऱ्याही चोरट्यांनी फोडल्या. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरी झालेल्या दुकांनासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Theft at five places including two jewelry shops in Sakoli, Rs 50 lakh stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.