खेड तालुक्यातील अंबोली येथे माजी उपसरपंचाचे घर फोडले; चार लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:29 PM2019-07-17T15:29:17+5:302019-07-17T15:30:29+5:30
अंबोली (ता. खेड ) येथील माजी उपसरपंच संतोष रामभाऊ काळडोके यांच्या घरावर रात्री १ ते २ च्या सुमारास दरोडा पडला.
खेड : अंबोली (ता. खेड ) येथील माजी उपसरपंच संतोष रामभाऊ काळडोके यांच्या घरावर रात्री १ ते २ च्या सुमारास दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरामध्ये आई व वडील यांचे हातपाय बांधून सुमारे ४ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबोली ता खेड येथील काळडोकवाडी येथे शेतातील घरामध्ये रामभाऊ कोंडू काळडोके ( वय ८५ वर्ष ) व त्यांची पत्नी मालाबाई काळडोके हे राहत्या घरी झोपले असता रात्री १ ते २ च्या दरम्यान दरोडे खोरांनी दरवाजा तोडुन घरात प्रवेश केला. दोघांचे हातपाय बांधून सुमारी ३ ते ४ लाख रूपयांचे दागिने व ५० हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेला. घरामध्ये तीन दरोडेखोर तोंडावर रूमाल बांधुन घुसले होते. त्यांच्या अंगात टी -शर्ट व जिन्स पॅन्ट घातल्या होत्या.