पुण्यात घरफोडीचे सत्र संपता संपेना : नागरिकांच्या डोकेदुखीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:50 PM2019-08-19T16:50:11+5:302019-08-19T16:52:20+5:30

मागील काही महिन्यांपासून घरफोडी, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. 

theft incident continuously Increasing in pune city | पुण्यात घरफोडीचे सत्र संपता संपेना : नागरिकांच्या डोकेदुखीत वाढ

पुण्यात घरफोडीचे सत्र संपता संपेना : नागरिकांच्या डोकेदुखीत वाढ

Next
ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे काही चालेना

पुणे : सरासरी दिवसाला तीन ते चार घरफोडीच्या घटना शहरात होत आहेत. यावर नागरिक  त्रस्त झाले असून त्यांनी पोलीस प्रशासनाकडे यावर गुन्हेगारांना पकडण्याचे व त्यांना कडक शासन करण्याचे आवाहन केले आहे. मागील काही महिन्यांपासून घरफोडी, दरोड्याच्या घटना वाढल्या असून यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. शहर व उपनगरांमध्ये सातत्याने वाढणाºया या घटनांविरोधात तातडीने उपाययोजनेची पावले पोलिसांकडून उचलली जावीत, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. 
१७ ते १८ ऑगस्ट रोजी दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास डीपी रस्त्यावरील सुजल अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन १ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोने व हि-याचे दागिने असा एकूण ४ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. फ्लॅटला कुलूप असताना देखील चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटवून घरात शिरुन चोरी केली. याबाबत शेखर तेंडूलकर (वय ५७, रा. एरंडवणा, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक एस के गोरे करीत आहेत. घरफोडीची दुसरी घटना डहाणूकर कॉलनी येथील नवरंग अपार्टमेंट येथे घडली. याप्रकरणी ५२ वर्षीय एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेत चोरट्याने घराचा मुख्य दरवाजाला असलेले कुलूप तोडून घरात घुसून २ लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एच. माळी हे करीत आहेत. 
केवळ शहरांमध्येच नव्हे तर उपनगरांमध्ये देखील घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. यावर पोलिसांकडून तत्परतेने कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. पोलिस प्रशासनाने यावर नागरिकांना आपआपल्या सोसायट्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले आहे. यामुळे चोरांचा माग काढणे शक्य असून त्याव्दारे फिर्यादीची गेलेली रक्कम काही अंशी मिळण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

Web Title: theft incident continuously Increasing in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.