Video : मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी;43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:52 PM2021-04-11T15:52:40+5:302021-04-11T15:53:41+5:30
Crime News : टॅन्कमधील ११,६०० रूपये किमतीचे अंदाजे २०० लीटर ऑईल चोरी करुन लोखंडी पिंपामध्ये काढुन अपहार केला होता.
वैभव गायकर
पनवेल : मिक्स ईन्डस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी करुन अपहार करणाऱ्या ५ ट्रान्सपोर्टचे कंपनीचे मालकांना व एका चालकास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.फिर्यादी यांच्या हस्थी केमीकल, तळोजा कंपनीचा मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईलचा टॅंक सुनिल ट्रान्सपोर्टचे ट्रक क्र. एम.एच .४६ एफ ५२२८ वरील चालक प्रल्हाद गोरख गर्जे याचे ताब्यात पोच करण्यासाठी दिला असता त्याने व त्याचे साथीदार यांनी आपसात संगनमत करून रात्री ०१:३० वाजण्याचे सूमारास निलेश ढाब्याजवळ पनवेल येथे सदर टॅन्कमधील ११,६०० रूपये किमतीचे अंदाजे २०० लीटर ऑईल चोरी करुन लोखंडी पिंपामध्ये काढुन अपहार केला होता.
सदर ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारला असता सदर आरोपीत हे पळुन गेले होते . म्हणुन फिर्यादी यांच्या तक्रारीवरू सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह , पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव , अपर पोलीस आयुक्त डॉ . बी . जी . शेखर पाटील , पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील व सहा . पोलीस आयुक्त , नितीन भोसले - पाटील यांनी विशेष प्रयत्न करुन आरोपी अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वपोनि अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्हयातील पाहीजे आरोपीत चालक प्रल्हाद गोरख गर्जे व त्याचे पाच साथीदार ( ट्रान्सपोर्ट मालक ) यांना अटक केली आहे. अटक आरोपीत हे वेगवेगळया ५ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक असुन त्यांच्या कोणात्याही ट्रान्सपोर्ट कंपनीला “ मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईलचा " टॅन्क पोहोच करण्यासाठी भाडे मिळाल्यास सदर आरोपीत " मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईल " टॅन्कचे सिल न तोडता सिलचे बाजुलचे नट बोल्ट पान्याने खोलुन झाकण ओपन करुन त्यामध्ये पाईप टाकुन सदर ऑईलची चोरी करतात व आप आपसात ऑईल वाटुन घेतात . सदर ऑईल त्यांचे ट्रान्सपोर्टचे ट्रकमध्ये इंधन म्हणुन वापरतात.
मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी;43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत pic.twitter.com/0bZTQFsCWP
— Lokmat (@MiLOKMAT) April 11, 2021
सदर ऑईल टॅन्कचे वजन मॅनेज करण्याठी जेवढे ऑईल चोरी केले तेवढे पाणी मिक्स करतात असे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी पोलिस उपनिरीक्षक तपास अधिकारी - सुनिल तारमळे व त्यांच्या पथकाने आरोपींची नावे प्रल्हाद गोरख गर्जे , वय ३६ , धंदा - चालक सुनिल ट्रान्सपोट सुनिल महादेव वनवे , वय ३० वर्ष , धंदा- मालक सुनिल ट्रान्सपोर्ट , नवीन पनवेल संपत गोरख पालवे , वय ३३ वर्ष , धंदा - मालक प्रथमेश ट्रान्सपोर्ट , पनवेल , शिवाजी महादेव इंगवले , वय ३५ वर्षे धंदा - मालक शुभम ट्रान्सपोर्ट , नवीन पनवेल , काकासाहेब भिमराव नागरगोजे , वय ३६ वर्षे , धंदा - मालक दिपक ट्रान्सलाईन्स , नवीन पनवेल शाहदेव उर्फ बाप सुखदेव पालवे , वय ४४ वर्ष , धंदा मालक - विशाल ट्रान्सपोर्ट , कामोठे यांना अटक केली आहे व त्यांच्याकडून हस्तगत माल . २४,८८,०० किचा ट्रक क.एम एच .४६ एफ ५२२८ त्यावर मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईलचा टॅन्क ११,६०० रू किंचे एक लोखंडी पिंप त्यामध्ये अंदाजे २०० लीटर मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकार्बन ऑईल . ३,००० रू . किचा १ प्लास्टीक पाईप , ३ पाने , ४ लोखंडी पिंप . ८,००,०० - रू.कि.ची पांढ - या रंगाची ब्रिझा कार कमांक एम एच १२ पी एफ ०१२१ ८,००,००० रू.कि.ची रू.कि.ची ग्रे रंगाची ब्रिझा कार कमांक एम एच ४७ क्यु ८३१६ ५०,००० - रू.किं.ची काळया रंगाची सी बी शाईन मोटार सायकल क . एम एच ०३ बी एम ९९ ५५ ५०,००० रू.किं.चीकाळया रंगाची बजाज डिसकव्हर मोटार सायकल क . एम एच २३ ए ए ४६७ ९ ७७,००० रू.कि.चे ५ मोबाईल फोन ४२.८,०००. असा माल हस्तगत करण्यात आला आहे.