पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:29 PM2019-08-07T20:29:36+5:302019-08-07T20:30:29+5:30

पिंपरीत ३० लाख ७५ हजारांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

theft of Old women diamonds and gold jewellery at Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास

पिंपरी-चिंचवड  येथे वृध्द महिलेचे ३० लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देचोरी, जबरी चोरीचे तीन प्रकार

पिंपरी : चोरीचा एक व जबरी चोरीचे दोन असे एकूण तीन गुन्हे पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे दाखल झाले आहेत. पिंपरीत एका वृध्द महिलेचे तब्बल ३० लाख ७५ हजारांचे हिरे व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी घरकाम करणाºया दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील अजमेरा येथील विना रोषा (वय ७४) यांचे ३० लाख ७५ हजारांचे हिºयांचे व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी विना यांचा मुलगा राजीव अशोक रोषा (वय ४५, रा. अजमेरा, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोनम संतोष कटारे (वय २९, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) व प्राजक्ता उर्फ प्रज्ञा संजय लोंढे (वय ३०, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सोनम कटारे व प्राजक्ता लोंढे या दोघीही विना रोषा यांच्याकडे घरकाम करतात. सोनम कटारे स्वयंपाक तर प्राजक्ता साफसफाईचे काम करते. विना रोषा सोमवारी (दि. ५) एका सोहळ्यानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तेथून परत आल्यानंतर त्यांनी घरातील कपाटात त्यांचे हिºयाचे व सोन्याचे दागिने ठेवले. मंगळवारी (दि. ६) सकाळी नऊच्या दरम्यान आरोपी सोनम कटारे स्वयंपाक करण्यासाठी आली. दुपारी बाराच्या सुमारास ती स्वयंपाक करून गेली. त्यानंतर साफसफाई करण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास प्राजक्ता आली. त्यावेळी विना रोषा यांच्या घरातील नळाची दुरुस्ती करण्यासाठी प्लंबर आला होता. त्याने नळ दुरुस्ती केल्याने त्याला पैसे देण्यासाठी विना रोषा यांनी कपाट उघडले असता, कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मुलगा राजीव यांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे तपास करीत आहेत.
दुसºया प्रकरणात दुचाकीवरील तीन अनोळखी आरोपींनी मॉर्निंग वॉक करणाºया ज्येष्ठ नागरिकास लुटले आहे. जबरी चोरीचा पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी श्रीपाद नारायण एरंडे (वय ६२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी एरंडे रविवारी (दि. ४) मोरवाडीत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी त्यांना अडविले. लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देऊन फियार्दी एरंडे यांच्या हातातील ३५ हजारांची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
तिसºया प्रकरणात दुचाकीस्वारास अडवून तीन अनोळखी इसमांनी रोकड तसेच मोबाइल लंपास केला. याप्रकरणी संतोष सदाशिव नढे (वय ३३, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी नढे दि. ३१ जुलै रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास मोशीतील सीएनजी पंप रोडने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी तीन अनोळखी आरोपींनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि १ हजार ७५० रुपये रोख असा एकूण ६ हजार ७५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: theft of Old women diamonds and gold jewellery at Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.