प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 04:05 PM2019-05-22T16:05:15+5:302019-05-22T16:06:44+5:30

महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

theft from Passenger women purse about 5 lakhs | प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास 

प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास 

Next
ठळक मुद्देदोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कात्रज-निगडी दरम्यानच्या प्रवासात रविवारी (दि. १९) हा प्रकार घडला. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अंकिता नितेश साबळे (वय २५, रा. देहूगाव) यांनी मंगळवारी (दि. २१) फिर्याद दिली आहे. दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 
अंकिता साबळे आणि त्यांच्या आई रविवारी (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रज-दरम्यान पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या आईकडे असलेल्या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची दोन लहान पाकिटे आणि रोख रक्कमकेचे पाकिट होते. यात २१३ ग्रॅम सोन्याचे दागिने होते. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा पाच लाख ३५ हजार ७०० रुपयांचा ऐवज त्यात होता. दोन महिला आणि एका चोरट्याने नजर चुकवून हा ऐवज लंपास केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Web Title: theft from Passenger women purse about 5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.