छोट्या छोट्या मुली आहेत, सोडा! होम स्टे हॉटेलमधील महिलेवर सामुहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:26 AM2023-11-13T10:26:09+5:302023-11-13T10:27:37+5:30
महिलेचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या बयानानुसार तिला जबरदस्तीने खोलीत नेण्यात आले आणि तिला मारहाणही करण्यात आली.
उत्तर प्रदेशच्या आग्रामधील होम स्टे हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यावर सामुहिक बलात्कार झाला आहे. यावेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पीडिता रडून रडून तिला सोडण्यासाठी विनवण्या करत असताना दिसत आहे. या लोकांच्या अत्याचारामुळे तिने पँटीतच लघवी केल्याचेही व्हिडीओमधून समजत आहे. तिने विरोध करताच तिला मारहाणही करण्यात आली आहे.
महिलेचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या बयानानुसार तिला जबरदस्तीने खोलीत नेण्यात आले आणि तिला मारहाणही करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या होम स्टेमध्ये तिचा मित्र आला होता, त्याने सोबत चार जणांना आणले होते. या पाच जणांनी तिला दारू पाजली होती.
पीडितेचे वय २५ वर्षे आहे. सुरुवातीला तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यात आला होता. यावरून तिला ब्लॅकमेल केले जात होते. आरोपींनी तिच्या डोक्यावर काचेची बॉटल देखील फोडली होती. गेल्या दीड वर्षापासून ही महिला या होम स्टेमध्ये नोकरी करत होती. तिचा मित्र जितेंद्र त्याच्या मित्रांना घेऊन आला होता.
एका व्हिडीओमध्ये रुमच्या बाहेर जमिनीवर पडलेली महिला दिसत आहे, त्याच्या बाजुला एक आरोपी उभा होता त्याला ती माझ्या छोट्या छोट्या मुली आहेत, असे सांगत आहे. टॉर्चर केल्याचा आरोप करत आहे, तसेच वाचवा वाचवा असे ती ओरडत आहे. काही तरुण तिला बाहेर ओढून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडिता त्यांना हात जोडून सोडूनदेण्यासाठी विनवण्या करत आहे.
एसीपी सदर अर्चना सिंह यांनी सांगितले की, ताजगंज पोलिसांना बसई चौकी परिसरातील होम स्टेमध्ये बलात्कार आणि मारहाणीची घटना घडल्याची माहिती मिळाली होती. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे घटनेची दखल घेत बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.