बलात्कार झाला नाही, तोल जाऊन रेल्वेतून पडली 'ती' तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 09:32 PM2020-12-28T21:32:36+5:302020-12-28T21:33:28+5:30

Crime News : वाशी खाडीपुलावर रुळालगत आढळली होती

There was no rape, she fell from the train | बलात्कार झाला नाही, तोल जाऊन रेल्वेतून पडली 'ती' तरुणी

बलात्कार झाला नाही, तोल जाऊन रेल्वेतून पडली 'ती' तरुणी

Next
ठळक मुद्देवैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्काराची शक्यता वर्तवली गेल्याने पोलिसांनी तपासावर जोर दिला होता.

नवी मुंबई - रेल्वेरुळालगत जखमी अवस्थेत आढळलेल्या त्या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे उघड झाले आहे. सहा दिवसांनी ती शुद्धीत आल्यावर रेल्वेपोलिसांना घटनेचा उलगडा झाला. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्काराची शक्यता वर्तवली गेल्याने पोलिसांनी तपासावर जोर दिला होता.

वाशी मानखुर्द दरम्यान खाडी पुलालगत सुमारे 25 वर्षीय अज्ञात तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. सकाळी  सहा वाजण्याच्या सुमारास ती रुळालगत पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डोक्यावर मार लागल्याने ती जखमी अवस्थेत होती. यामुळे सखोल तपास करून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांची माहिती मिळवून तिची ओळख पटवली होती. यादरम्यान वैद्यकीय चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावरून अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार करून रेल्वेतून फेकून दिल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपासावर जोर दिला होता. याकरिता ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. मात्र कसलाही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. यामुळे जखमी तरुणी शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा पोलीस करत होते. अखेर सात दिवसांनी सोमवारी ती शुद्धीवर आली असता, तोल जाऊन आपण रेल्वेतून पडल्याची कबुली तिने दिल्याचे वाशी रेल्वे पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले. 


सदर तरुणी हि मुंबईची राहणारी असून त्याच परिसरात नोकरी करणारी आहे. घटनेच्या एक दिवस अगोदर तिचे मित्रांसोबत भांडण झाले होते. यावरून ती तणावात रेल्वेतून फिरत नवी मुंबईत येत होती. यादरम्यान ती लोकलच्या दरवाजात उभी असताना खाडीपूल लगत तोल जाऊन खाली पडली होती. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध झाली होती. मात्र वैद्यकीय अहवालात समोर आलेल्या बाबीवरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तवली गेल्याने, न घडलेल्या घटनेच्या तपासावर पोलिसांना जोर द्यावा लागला.

Web Title: There was no rape, she fell from the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.