... म्हणून मनसे उमेदवार संदीप पाचंगेंची अटक टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:37 PM2019-10-10T13:37:34+5:302019-10-10T13:40:12+5:30

खड्डयात मंत्र्यांची चित्रं काढल्याप्रकरणी १५ दिवसांनी हजर राहण्याचे पोलीसांचे फर्मान

... Therefore, the arrest of MNS candidate Sandeep Panchange was avoided | ... म्हणून मनसे उमेदवार संदीप पाचंगेंची अटक टळली

... म्हणून मनसे उमेदवार संदीप पाचंगेंची अटक टळली

Next
ठळक मुद्देकितीही केसेस पडू द्या, सर्वसामान्यांसाठी लढा सुरुच ठेवणार - संदीप पाचंगेपोलिसांच्या निर्णायक भूमिकेमुळे पाचंगेंसह मनसैनिकांची अटक आज टळली.

ठाणे - रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या ठाणेकरांची व्यथा मांडण्यासाठी या खड्डयात मंत्र्यांची चित्रं रेखाटणार्‍या मनविसेचे जिल्हाध्यक्ष आणि ओवळा - माजिवडा विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप पाचंगेंसह आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज न्यायालयात आरोपपत्र सादर करुन संदीप पाचंगेंसह इतर मनसैनिकांना अटक केली जाणार होती. त्यामुळे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत मनसेच्या उमेदवारावर जेलवारी करण्याची वेळ आली होती. मात्र, पोलिसांच्या निर्णायक भूमिकेमुळे पाचंगेंसह मनसैनिकांची अटक आज टळली.

या प्रकरणात पुढील १५  दिवसांनी हजर राहण्याचे फर्मान पोलीसांनी दिले आहे. मात्र, कितीही केसेस पडू द्या, सर्वसामान्यांसाठी लढा सुरुच ठेवणार असल्याचे मत संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले. तसेच प्रचार सोडून राजकीय गुन्ह्यात अडकवणार्‍या विरोधकांना ही चपराक असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

७ ऑगस्ट २०१९ रोजी मानपाडा येथील हॅप्पी व्हॅली परिसरात संदीप पाचंगे व मनसे उपशहराध्यक्ष पुष्करराज विचारे, प्रभाग अध्यक्ष अमोल राणे, मनसे शाखाध्यक्ष सागर भोसले, सचिन जांभळे, संतोष निकम, गोकुळ बोरसे, निलेश चौधरी आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चित्रं खड्डयात रेखाटून या प्रकरणी अनोख्या पध्दतीने निषेध केला होता.





 

Web Title: ... Therefore, the arrest of MNS candidate Sandeep Panchange was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.