म्हणून मालकाला महिलेने घातला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 09:19 PM2018-08-20T21:19:40+5:302018-08-20T21:20:06+5:30

या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी शालू सोनावणे (वय - २९) हिला अटक केली आहे.  न्यायालयाने आरोपी शालूला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Therefore, the owner is dupe money by the woman | म्हणून मालकाला महिलेने घातला गंडा 

म्हणून मालकाला महिलेने घातला गंडा 

Next

मुंबई - कामावरून काढल्याच्या सूढ भावनेतून मालकाच्या स्विय सहाय्यक महिलेने मालकालाच ९० हजारांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी शालू सोनावणे (वय - २९) हिला अटक केली आहे.  न्यायालयाने आरोपी शालूला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

साकी विहार रोड येथील तुंगा विलेजमध्ये रहायला असलेली शालू ही ताडदेव परिसरातील "हमारी संस्कृती" या खासगी कंपनीमध्ये  मालकाचे स्विय सहाय्यकाचे काम पहायची. डिसेंबर २०१६ मध्ये कंपनीच्या मालकाने ताडदेव येथील बँक आॅफ बडोदा शाखेत डेबीट कार्डची मागणी केली होती. त्यानुसारबँकेने कंपनीच डेबिट कार्ड आणि पासवर्ड पोस्टाद्वारे पाठवून दिले. हे डेबिट कार्ड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शालूजवळ आणून दिले. कंपनीचे मालक कामानिमित्त वारंवार राज्याबाहेर जात असल्यामुळे या डेबीट कार्डद्वारे रेल्वेचे तिकिट बुकींग केले जात होते. त्यामुळे त्या डेबिटकार्डचा पासवर्डही शालूला माहित होता. दरम्यान, कंपनीचे काम कमी झाले होते. त्याचबरोबर कंपनीची बाहेरील काम शालूला फारसे जमत नसल्यामुळे मे २०१७ मध्ये शालूला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. 

नोव्हेंबरमध्ये "हमारी संस्कृती" या खासगी कंपनीचे मिरारोड येथील कार्यालयातून अकाऊन्टंटचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ९० हजार रुपयांचा हिशोब लागत नव्हता. त्याबाबत त्याने मालकाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर एटीएमकार्डच आपल्याजवळ नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ताडदेव येथील बँकेत जाऊन काढण्यात आलेल्या पैशांची चौकशी केली असताना. ते पैसे टप्याटप्याने शालूने काढल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी शालूला १८ आॅगस्ट रोजी अटक केली. मालकाने कामावरून कमी केल्याच्या रागातूनच आपण हे कृत्य केल्याची कबूली शालूने दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने शालूला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Therefore, the owner is dupe money by the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.