Shraddha murder case बद्री, कुमार, डॉक्टर...'हे' ६ जण उघडतील आफताबचे पुनावालाचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:59 PM2022-11-17T15:59:39+5:302022-11-17T16:03:54+5:30
श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपुर्वीच म्हणजे मे महिन्यातच झाली आहे. त्यामुळे आफताब पुनावाला विरोधात पुरावे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे.
Shraddha murder case : श्रद्धा वालकरच्या हत्येने देश हादरला आहे. विशेष म्हणजे श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपुर्वीच म्हणजे मे महिन्यातच झाली आहे. त्यामुळे आफताब पुनावाला विरोधात पुरावे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे. क्राईम सीन वरुन पोलिसांना काहीच मिळालेले नाही. मात्र या केसमध्ये असे काही पात्र आहेत ज्यांची चौकशी करुन अधिक माहिती घेतली जाऊ शकते. ते ६ जण कोण आहेत जे हत्येचा उलगडा करतील, साक्ष देतील बघुया.
१. बद्री
आफताब आणि श्रद्धा हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले होते. ११ मे पर्यंत ते सुट्टीवर होते. हिमाचल प्रदेशमध्ये बद्री या व्यक्तीने दोघांची राहायची व्यवस्था केली होती. हत्येच्या आधी शेवटचे ते बद्री ला च भेटले होते. सुट्टीवर असताना तिथे काही झाले होते का यासंदर्भात पोलिस बद्रीची चौकशी करत आहेत.
२. राजेंद्र कुमार
श्रद्धा आणि आफताब छतरपुर येथे राहत असताना राजेंद्र कुमार या व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होते. ९००० रुपये तिथले भाडे होते. कुमारने सांगितले आफताब राहायला आल्यापासून पाण्याचा वापर वाढला होता. दिल्लीत २० हजार लीटर पाणी मोफत मिळते अशात आफताबचे ३०० रु पाण्याचे बिल आल्याने आश्चर्य वाटले.
३. डॉ. अनिल सिंह
मे मध्ये आफताब डॉ अनिल सिंह यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. सिंह यांनी सांगितले, त्यांना आफताब आक्रमक वाटला पण काही संशय घेण्यासारखे त्यात वाटले नाही.
४. सुदीप सचदेवा
सुदीप सचदेवा याचे छत्रपुरमध्ये होम अॅंड किचन स्टोर आहे. आफताबने पोलिसांना सांगितले की त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी इथुनच हत्यार खरेदी केले होते. आफताब कधी आला होता हे मात्र सचदेव यांना आठवत नाही.
५. लक्ष्मण नादर
लक्ष्मण नादर हा श्रद्धाचा मित्र आहे ज्याने श्रद्धाच्या वडिलांना फोन करुन सांगितले की श्रद्धाचा तीन महिन्यांपासून काहीच संपर्क होत नाहीए. यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. नादरने पोलिसांना सांगितले आफताब आणि श्रद्धामध्ये भांडणं होती.
६. तिलक राज
तिलक राज यांचे तिलक इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. तिलक राज यांनी सांगितले आफताबने त्यांच्याकडुनच फ्रीज खरेदी केला होता.