पीपीई सूट घालून आले अन् सुकामेवा घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:49 PM2020-08-17T16:49:13+5:302020-08-17T17:06:55+5:30

चोरट्यांनी फोडले मॉल : तीच अल्टो कार सीसीटीव्हीत कैद

They came in PPE suit and took the drब fruits | पीपीई सूट घालून आले अन् सुकामेवा घेऊन गेले

पीपीई सूट घालून आले अन् सुकामेवा घेऊन गेले

Next
ठळक मुद्देअल्टोकारधारक पीपीई सुटमधील या भुरट्या चोरट्यांनी नाशिक पोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. मॉलमधून चोरट्यांनी सुकामेवा व दोन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे.

पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सूट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी अमृतधाम लिंक रोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यावेळीसुद्धा ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी पीपीई सूट घातलेला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. चोरटे अल्टो कारमधून आल्याचे फुटेजमधून स्पष्ट होते. अल्टोकारधारक पीपीई सुटमधील या भुरट्या चोरट्यांनी नाशिकपोलिसांना चांगलेच आव्हान दिले आहे. मॉलमधून चोरट्यांनी सुकामेवा व दोन हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे.

 

मेरी अमृतधाम लिंक रोडवरील वरदविनायक मंदिराजवळ  आकाश शांताराम बोंडे यांच्या मालकीचे हाय स्ट्रीट मार्ट  मॉल आहे. सोमवारी पहाटेच्या वेळी एका राखाडी रंगाच्या अल्टो कारमधून आलेल्या चौघा संशयितांना पैकी तिघांनी काहीतरी लोखंडी वस्तूच्या सहाय्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करत त्यांनी दुकानातील गल्ला तसेच काजू बदाम असलेले ड्रायफूटचे तीन ते चार पाकीट चोरी केले. दुकानातील गल्यात अंदाजे  तीन हजार रुपयांची रोकड होती तसेच 6 ते 7 हजार रुपयांचे ड्रायफूट असा जवळपास अंदाजे दहा हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 

पहाटेच्या सुमारास सुरक्षरक्षक मॉलच्या मागील बाजूस झोपलेला असताना चोरट्यानी संधी साधून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखेडे, हवालदार संदीप शेळके, नितीन जगताप आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे. 


भुरटे चोर हिरावाडीतील?
काही दिवसांपूर्वी म्हसरूळ शिवारात असलेल्या एका देशी-विदेशी दारू दुकानातून हजार रुपयांची रोकड चोरणारे संशयित व मेरी अमृतधाम लिंक रोडवरील मॉलमध्ये चोरी करणारे संशयित यांनी पांढऱ्या रंगाचा पीपीई सूट घातल्याने दोघा घटनेतील संशयित यांचे वर्णन मिळतेजुळते असून सदरचे चोरटे हे हिरावाडी परिसरातीलच भुरटे चोर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवर सराफी दुकान फोडणारे चोरट्याचे वर्णन व गुन्हयाची पद्धत एकसारखी असल्याचे आढळून येते.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

Web Title: They came in PPE suit and took the drब fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.