आरटीओ कर्मचारी म्हणून सांगितलं आणि रिक्षाच पळवली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 03:02 PM2018-07-03T15:02:19+5:302018-07-03T15:04:41+5:30

आम्ही आरटीओ कर्मचारी आहोत, तुमच्या  रिक्षाची तपासणी करायची आहे, असे सांगत रिक्षाच पळवल्याची घटना पुण्यातीलभोसरी येथे घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात कृष्णा ओव्हाळ (वय २७, रा. काठोडा, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. 

they told themselves as RTO employee and stolen autorickshaw | आरटीओ कर्मचारी म्हणून सांगितलं आणि रिक्षाच पळवली 

आरटीओ कर्मचारी म्हणून सांगितलं आणि रिक्षाच पळवली 

Next

 पुणे  : आम्ही आरटीओ कर्मचारी आहोत, तुमच्या  रिक्षाची तपासणी करायची आहे, असे सांगत रिक्षाच पळवल्याची घटना पुण्यातीलभोसरी येथे घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात कृष्णा ओव्हाळ (वय २७, रा. काठोडा, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. 

 

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी ओव्हाळ हे कामानिमित्त भोसरी येथील मॅगझीन चौकात आले होते. तिथे त्यांना दोन अज्ञात पुरुष व एक महिला यांनी आरटीओ कर्मचारी असल्याचे सांगत त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी त्यांची कागदपत्रेही तपासली. ही चर्चा सुरु असताना त्यांनी ओव्हाळ यांना रिक्षातून खाली उतरवले. त्यांच्यापैकी एकजण त्यांच्याशी बोलतही होता. त्यांना बोलण्यात गुंतवून दुसऱ्या साथीदाराने रिक्षा सुरु केली आणि तिघेही रिक्षासह पसार झाले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. 

Web Title: they told themselves as RTO employee and stolen autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.