रस्त्यात अडविले, मारहाण केली अन् मोबाईल घेऊन पसार झाले....; दोन संशयित युवक ताब्यात

By सागर दुबे | Published: April 14, 2023 03:07 PM2023-04-14T15:07:10+5:302023-04-14T15:07:21+5:30

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

They were stopped on the road, beaten up and taken away with mobile phones...; Two suspected youths in custody | रस्त्यात अडविले, मारहाण केली अन् मोबाईल घेऊन पसार झाले....; दोन संशयित युवक ताब्यात

रस्त्यात अडविले, मारहाण केली अन् मोबाईल घेऊन पसार झाले....; दोन संशयित युवक ताब्यात

googlenewsNext

जळगाव : शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाजवळील रस्त्यावर एका प्रौढाचा चोरट्याने मोबाईल लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील इंद्रनिल सोसायटी येथे नितीन रमेश सोनवणे हे वास्तव्यास आहेत. ते गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजी नाट्यगृहाजवळील संभाजी राजे नाट्यगृह परिसरात आले होते. दोन युवकांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. 

सोनवणे यांनी लागलीच रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत. सोनवणे यांच्या तक्रारीवरून त्या दोन्ही युवकांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.
 

Web Title: They were stopped on the road, beaten up and taken away with mobile phones...; Two suspected youths in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.