पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सराईत चोरटा झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:59 PM2021-01-25T18:59:41+5:302021-01-25T19:00:51+5:30
Crime News : पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण व पथकाने समीर ह्याला अटक केल्यावर नया नगर पोलीस ठाणे इमारतीतील लॉक अपमध्ये ठेवले होते.
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनीअटक केलेला सराईत चोरटा हा पोलीस ठाण्यातील शौचालयाची जाळी तोडून पसार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे . नया नगर पोलिसांनी गस्ती दरम्यान सोमवारी पहाटे ४ . २३ च्या सुमारास समीर अकबर शेख (३०) रा. गेट क्र . ७ , मालवणी, मालाड ह्या सराईत चोरट्यास अटक केली होती. सदर चोरट्यावर विविध पोलीस ठाण्यात सुमारे ६ गुन्हे दाखल असल्याचे सूत्रां कडून सांगण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण व पथकाने समीर ह्याला अटक केल्यावर नया नगर पोलीस ठाणे इमारतीतील लॉक अपमध्ये ठेवले होते. सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान शौचालयास जायचे समीरने सांगितल्याने पोलिसांनी त्याला पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले.
देशात महाराष्ट्राचा डंका! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात पटकावलं तिसरं स्थान
NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध
परंतु बराच वेळ झाला तरी समीर हा बाहेर न आल्याने पोलिसांनी पडताळणी केली असता शौचालयाच्या खिडकीस असलेली एल्युमिनियनची जाळी तोडून तो पाईप वरून खाली उतरून पळून गेल्याचे उघडकीस आले. आरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्याने पोलीस वर्तुळात एकाच खळबळ उडाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत. परंतु रात्री पर्यंत आरोपीचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.