बापरे! ११ लाख रुपये किमतीच्या टूथपेस्ट चोरी करुन गावी पोहोचला चोर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 08:14 AM2022-11-26T08:14:48+5:302022-11-26T08:16:31+5:30

तब्बल ११ लाख रुपये किमतीच्या टूथपेस्टचे एकूण २१५ बॉक्स घेऊन दिल्लीहून फरार झालेल्या चोराला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बहाराइच जिल्ह्यातील एका गावातून अटक केली आहे.

thief who stole toothpaste boxes from delhi arrested from bahraich | बापरे! ११ लाख रुपये किमतीच्या टूथपेस्ट चोरी करुन गावी पोहोचला चोर अन्...

बापरे! ११ लाख रुपये किमतीच्या टूथपेस्ट चोरी करुन गावी पोहोचला चोर अन्...

googlenewsNext

बहारइच-

तब्बल ११ लाख रुपये किमतीच्या टूथपेस्टचे एकूण २१५ बॉक्स घेऊन दिल्लीहून फरार झालेल्या चोराला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बहाराइच जिल्ह्यातील एका गावातून अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याच्या गावातील त्याच्या घरातून टूथपेस्टचे बॉक्स देखील जप्त केले आहेत. 

२२ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाहोरी गेट ठाण्यात कुंवर पाल सिंह यांचा मुलगा हरस्वरुप सिंह यांनी टूथपेस्टचे २१५ बॉक्स चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणात दिल्ली पोलीस आरोपी ऊदल कुमार उर्फ संतोष याचा शोध घेत होती. आरोपी यूपीच्या बहाराइच जिल्ह्यातील जरवल रोड ठाणे हद्दीतील खासेपूर गावातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाहोरी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमाकांत आणि सहाय्यक उपनिरीक्षक हरेंद्र सिंह यांनी जरवल पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपी ऊदल कुमारच्या गावात म्हणजेच खासेपूर येथे छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांना गायब झालेल्या टूथपेस्टच्या बॉक्ससह आरोपी ऊदल कुमार देखील सापडला. आरोपीला मुद्देमालासह अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच दिल्लीहून चोरी करण्यात आलेले टूथपेस्टचे बॉक्स देखील जप्त करण्यात आले आहेत. 

एका मोठ्या प्लास्टिकखाली हे टूथपेस्टचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. या मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोलिसांनी आरोपीला दिल्लीत आणलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: thief who stole toothpaste boxes from delhi arrested from bahraich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.