चोरट्यांनीही घेतली कोरोनाचा धास्ती; चोरी करताना मास्क, पीपीई किटचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:20 PM2020-07-03T14:20:29+5:302020-07-03T14:20:59+5:30

पोलिसांना या चोरट्यांची चेहरेपट्टी मिळू शकली नाही़ आता बॉडी लँग्वेजवरुन त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.

Thieves also fear of Corona; Use of mask, PPE kit while theft | चोरट्यांनीही घेतली कोरोनाचा धास्ती; चोरी करताना मास्क, पीपीई किटचा वापर

चोरट्यांनीही घेतली कोरोनाचा धास्ती; चोरी करताना मास्क, पीपीई किटचा वापर

Next

पुणे : पाषाण येथे एकाच रात्रीत ४ दुकाने फोडून चोरट्यांनीचोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका दुकानातून त्यांनी १५ हजार रुपये लंपास केले़ यावेळी दुकानात शिरलेले चोरटे हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यावरुन चोरट्यांनीही कोरोनाचा धास्ती घेतल्याचे दिसून आले़ हे चोरट्यांनी पीपीई किट सारखे संपूर्ण शरीर झाकलेले व तोंडाला मास्क लावले आढळून आले. त्यामुळे आता पोलिसांना या चोरट्यांची चेहरेपट्टी मिळू शकली नाही़ आता बॉडी लँग्वेजवरुन त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.
याप्रकरणी अनिल सोहनलाल आगरवाल (वय ५१, रा़ डिव ड्रॉप्स सोसायटी, बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आगरवाल यांचे पाषाण येथील आकाश कॉम्प्लेक्समध्ये आगरवाल सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. ३० जून रोजी त्यांनी रात्री ६ वाजता दुकान बंद केले. त्यानंतर १ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले. त्या दरम्यान चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानाच्या काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील १५ हजार रुपये चोरुन नेले. त्याचप्रमाणे दिनेश सयाराम चौधरी यांचे उत्तम सुपर मार्केट स्टोअर्स, प्रकाश ओमपुरी गोस्वामी यांचे हरिओम सुपर मार्केटमध्ये शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. 
पाषाण येथील बालाजी सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तीनही दुकानातून चोरट्यांना काहीही रोकड मिळू शकली नाही. 
 

कामगारामुळे वाचली चोरी
चोरट्यांनी पाषाणमधील तीन दुकाने फोडल्यानंतर त्यांनी दिनेश चौधरी यांच्या उत्तम सुपर मार्केटचे शटर उकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. चोरट्यांचा आवाज ऐकून आत झोपलेले कामगार जागे झाले. तेवढ्यात चोरट्यांनी शटर वाकवून आत जाऊ लागले. आतमध्ये कामगार पाहून चोरटे पळून गेले. आत कामगार असल्यामुळे दुकानातील चोरी वाचली. एका दुकानात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांनी तोंडाला मास्क लावला असून संपूर्ण अंग झाकून घेतले जाईल, असे पीपीई किटसारखा ड्रेस घातला असल्याचे दिसून आले आहे़ पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत.
.......

Web Title: Thieves also fear of Corona; Use of mask, PPE kit while theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.