सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक

By विलास जळकोटकर | Published: December 15, 2023 07:33 PM2023-12-15T19:33:44+5:302023-12-15T19:34:42+5:30

तिघांकडून गुन्ह्याची कबुली : १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Thieves arrested in Solapur in connection with theft of jewelry and cigarette wallet | सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक

सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक

विलास जळकोटकर,सोलापूर : दोन ठिकाणी घरफोडी करुन दागिने चोरुन नेणाऱ्या मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाकडून विडी घरकूल परिसरातून तर सिगारेटची पाकिटे चोरणाऱ्या दोघांना कल्याणनगर परिसरातून ताब्यात घेतले. गुरुवारी ही कारवाई करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख १८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, सिगारेटची पाकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ७ डिसेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि श्रीनाथ महाडिक, विजय पाटील गुन्हेगारांच्या मागावर होते. बातमीदारामार्फत घरफोडीच्या गुन्ह्यातील मुलगा (विधीसंघर्ष बालक) हा चोरीचे दागिने विक्रीसाठी विडी घरकूल येथील सोना चांदी अपार्टमेंट ते गोंधळे वस्ती रोडवर सानियानगर येथे येणार असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने विडी घरकूल परिसरात सापळा लावला. खबऱ्याच्या माहितीनुसार एक मुलगा संशयास्पद स्थितीत वावरताना त्याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने दोन ठिकाण घरफोडी केल्याचे कबूल केले. त्याच्या आईच्या उपस्थितीत त्याने चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून पोलिसांना दिली.

याचबरोबर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कन्टीनचा पत्रा उचकटून ९ हजार ३१० रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरणाऱ्या प्रशांत दत्तात्रय गरडे (वय- २०, रा. कल्याणनगर भाग २, सोलापूर) आणि सोमलिंग सिद्धाराम फुलारी (वय- १९, रा. कल्याण नगर भाग १, सोलापूर) या दोघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.

तीन गुन्हे उघडकीस
संबंधीत मुलानं केलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केलेल्या चोरीतील २१ ग्रॅम सोन्याचे दागिने व १४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ ग्रॅम सोने आणि १४० ग्रॅम चांदीचे दागिने, २२ हजार ५०० रुपये रोकड असा १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या स्वाधीन केला. तर कॅन्टीनमधून ९ हजार ३१० रुपयांची सिगारेटची पाकिटे अन्य दोघांनी काढून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Thieves arrested in Solapur in connection with theft of jewelry and cigarette wallet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.