चोरांचा कारनामा! 8 फूट लांबीचं भुयार खणलं अन् बँकेत शिरले; 1 कोटीच्या सोन्यावर 'असा' मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:43 AM2022-12-24T11:43:48+5:302022-12-24T11:44:30+5:30

चोरांनी आठ फुटांचं भुयार खणून तब्बल एक कोटीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

thieves entered the bank by making tunnel broke strang room took away gold of 1 crore | चोरांचा कारनामा! 8 फूट लांबीचं भुयार खणलं अन् बँकेत शिरले; 1 कोटीच्या सोन्यावर 'असा' मारला डल्ला

चोरांचा कारनामा! 8 फूट लांबीचं भुयार खणलं अन् बँकेत शिरले; 1 कोटीच्या सोन्यावर 'असा' मारला डल्ला

Next

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरांनी आठ फुटांचं भुयार खणून तब्बल एक कोटीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. चोरांनी बँकेच्या मागील भागातून एक भुयार खणलं जे थेट स्टाँग रुमपर्यंत होतं. य़ानंतर ड्रिल मशीनने लादी तोडून ते आतमध्ये शिरले. स्ट्राँग रुममधील लॉकर हे गॅस कटरने कापून 1.812 किलोचं सोनं घेऊन पसार झाले. चोरांनी इतकी शिताफीने चोरी केली की बँकेमध्ये असलेला अलार्म देखील वाजला नाही. 

गुरुवारी सकाळी जेव्हा बँकेचा स्टाफ बँकेत पोहोचला तेव्हा चोरीची ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भानुती शाखेतून चोरीला गेलेल्या सोन्याचा अंदाज लावण्यात बँक अधिकाऱ्यांना काही तास लागले आणि त्यांनी दावा केला की चोरी झालेल्या 1.8 किलोपेक्षा जास्त असलेल्या सोन्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. बँकेजवळील मोकळ्या भूखंडातून चोरट्यांनी सुमारे चार फूट रुंद व आठ फूट लांबीचा भुयार खोदून ही घटना घडवून आणल्याचे बँक दरोडय़ाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे बँकेतीलच एखाद्याचे काम असू शकते, ज्याने या घटनेत व्यावसायिक गुन्हेगारांना मदत केली. आम्हाला स्ट्राँग रूममधून बोटांच्या ठशांसह काही पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे या घटनेचा खुलासा करण्यात मदत होऊ शकते. चोरट्यांनी या भागाची रेकी केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून त्यांना या बँकेचे बांधकाम, वास्तू इत्यादी तसेच स्ट्राँग रूम व सोन्याची जागा माहीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त बीपी जोगदंड यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी बँकेचे अधिकारी तेथे पोहोचले असता त्यांना स्ट्राँग रूमचा दरवाजा उघडा दिसला तेव्हा ही घटना उघडकीस आली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी ते भुयारही पाहिलं, जिथून चोरट्यांनी स्ट्राँग रूममध्ये प्रवेश केला. जोगदंड यांनी पीटीआयला सांगितले की, माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. दरम्यान, बँकेचे व्यवस्थापक नीरज राय यांनी पोलिसांना सांगितले की,1.8 किलोपेक्षा जास्त वजनाचे हे सोने 29 जणांचे आहे ज्यांनी त्यावर कर्ज घेतले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: thieves entered the bank by making tunnel broke strang room took away gold of 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.