VIDEO : दारूच्या दुकानात शिरले होते दोन चोर, बॉटल पाहून मन बदललं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:26 PM2022-09-06T12:26:23+5:302022-09-06T12:28:25+5:30
Thieves Get Drunk In Liquor Store: तामिळनाडूच्या या दोन चोरांनी दारूच्या दुकानात शिरून चोरी केली, सोबतच दारूही प्यायले. पण दारू जास्त झाल्याने त्यांचा चोरी करून पळून जाण्याचा प्लान फेल झाला आणि ते रंगेहाथ पकडले गेले.
Thieves Get Drunk In Liquor Store: दोन चोरांनी दारूच्या दुकानात चोरी करण्याचा पूर्ण प्लान केला. पण त्यांचा प्लान पूर्णपणे तेव्हा फेल झाला जेव्हा दारूच्या एकापेक्षा एक बॉटल पाहून त्यांचा तोल गेला. चोरी करण्याआधी ते दारू प्यायले आणि मग जे झालं ते वाचून थक्क व्हाल. तामिळनाडूच्या या दोन चोरांनी दारूच्या दुकानात शिरून चोरी केली, सोबतच दारूही प्यायले. पण दारू जास्त झाल्याने त्यांचा चोरी करून पळून जाण्याचा प्लान फेल झाला आणि ते रंगेहाथ पकडले गेले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, तामिळनाडूच्या तिरूवल्लूर जिल्ह्यात दोन चोरांनी दारूच्या बॉटल चोरी करण्यासाठी दारूच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडलं. त्यांनी बॉटल चोरी करून पैसे मिळवण्याचा विचार केला होता. पण त्यांनी आधी दारू ढोसली आणि मग दुकान सोडण्याचा विचार केला. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांनी विचारही केला नव्हता की, ते रंगेहाथ पकडले जातील. पोलिसांनी नंतर त्यांना त्याच छिद्रातून बाहेर येण्यास सांगितलं ज्यातून ते आत गेले होते.
Two men drilled a hole in the wall of a liquor shop & were boozing inside when caught redhanded by a patrol police in Thiruvallur district. The men had planned to steal the liquor bottles but decided to booze before taking off when they were caught @xpresstn@NewIndianXpresspic.twitter.com/zF9MoRjlUX
— Novinston Lobo (@NovinstonLobo) September 4, 2022
हा नजारा पाहून ट्विटर यूजर हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'सर्वात चांगली बाब ही आहे की, पोलिसांनी चोरांना त्याच छिद्रातून बाहेर काढलं. ते मालकाला बोलवून दरवाजा उघडू शकले असते'. एकाने लिहिलं की, 'मी यासाठी नेटफ्लिक्सला दोष देतो. त्यांनी द शोकेस रिडेम्पशन पाहिला असेल'. पोलिसांनी चोरांकडून 14 हजार रूपये रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. दारूची इतर दुकाने बंद असल्याने दोन्ही चोर सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या दारूच्या दुकानात घुसले होते.