अंबरनाथमध्ये खळबळ!  दरोड्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 15:57 IST2021-01-10T15:56:57+5:302021-01-10T15:57:28+5:30

Firing :तीन जण जखमी

Thieves opened fire on a jeweller's shop with the intent to rob | अंबरनाथमध्ये खळबळ!  दरोड्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार 

अंबरनाथमध्ये खळबळ!  दरोड्याच्या उद्देशाने चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार 

ठळक मुद्देहा गोळीबार नेमका कुणी आणि कशाच्या उद्देशातून केला हे अद्याप समजलेलं नाही.

अंबरनाथ:   अंबरनाथच्या पश्चिम भागातील सर्वोदय नगर परिसरात असलेल्या भवानी ज्वेलर्स या दुकानात गोळीबार झाला आहे. मात्र ज्वेलर्स मालकाने प्रतिकार केल्याने सशस्त्र दरोडा चा प्रकार रोखण्यात यश आले. मात्र या दरोड्याच्या प्रकारात दुकानातील तिघे जखमी झाली असून एकाच्या पायाला गोळी लागली आहे.
       

हा गोळीबार नेमका कुणी आणि कशाच्या उद्देशातून केला हे अद्याप समजलेलं नाही. दुचाकीवर आलेले काही हल्लेखोरांनी आधी दुकानात असलेल्या कामगारांशी चाकूचा धाक दाखवून हुज्जत घातली आणि त्यानंतर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. यावेळी हल्लेखोरांनी बंदुकीतून सहा राउंड फायर केले. दुकानाच्या मालकाने हल्लेखोरांना प्रतिकार केल्याने त्या हल्लेखोरांनी सुरुवातीला चाकूने विसन दसाणा आणि भैरव सिंह त्यांना जखमी केले. त्यानंतर दुकानाचे मालक लक्ष्मण सिंग दसाणा यांच्या दिशेने बंदूकीतून फायरिंग केल्याने लक्ष्मण यांच्या पायाला गोळी लागली आहेत. त्यानंतर बंदूक आणि चाकू तिथेच टाकून हल्लेखोरांनी पळ काढला. 

Web Title: Thieves opened fire on a jeweller's shop with the intent to rob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.