थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:10 AM2020-08-07T01:10:27+5:302020-08-07T11:21:35+5:30

पुणे - सातारा महामार्गालगतच्या कापूरव्होळ मधली खळबळजनक घटना..

Thieves in police uniforms stolen a gold jewelllery shop; He started firing and ran away | थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार

थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार

Next
ठळक मुद्देचोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गालगत कापूरव्होळ येथील भरचौकात ‘बालाजी ज्वेलर्स’ या दुकानावर पोलिसांच्या वेशात येत युवकांनी दरोडा टाकला. दुकानातील सोने चोरून नेत दुकानाबाहेर गोळीबार करत लुटारूंनी कारमधून पलायन केले.  या दुकानातील किती सोने चोरीला गेले असावे, याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.  


 याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार : कापूरव्होळ येथील  चौकात संजय निकम यांचे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. सायंकाळी पाच वाजता दुकान सुरू असताना फौजदाराच्या वेशात एक जण, तर एक पोलीस वर्दीमध्ये असे दोघे जण, तर साध्या वेशातील तिघे अशा पाच जणांनी दुकानात प्रवेश केला. दुकानाचे मालक संजय निकम यांना या तोतया पोलिसांनी दरडावून सांगत आमच्याबरोबर आणलेल्या तिघांनी तुमच्याकडे दरोड्यातील सोने विकले आहे.

या वेळी बाहेर असलेल्या युवकांनी लुटारूंना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र लुटारूंनी दुकानाच्या बाजूने आणि युवकांना पिस्तूल दाखवत हवेत ५ ते ६ गोळ्या झाडल्या. तसेच, त्यांनी आणलेल्या मोटारीतून सर्व लुटारू फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. दरोडेखोरांच्या तपासाठी पथके तयार करण्यात आले आहे. पुढील तपास  राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व त्यांचे पथक पुढील तपास करत आहे.

Web Title: Thieves in police uniforms stolen a gold jewelllery shop; He started firing and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.