मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला, चांदीच्या मुर्तीसह दानपेटी गेली चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:42 PM2020-08-25T13:42:07+5:302020-08-25T13:42:58+5:30
मागील काही दिवसांपासून करावे परिसरातल्या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
नवी मुंबई - करावे गावातील लक्ष्मी नारायण मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून दोघेजण सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून करावे परिसरातल्या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
शहरात चोरटयांनी धुडगूस घातला असून करावे गावात सातत्याने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. मोबाईल शॉप फोडण्यासह बंद घरात घरोफोडी घडत आहेत. अशातच मंगळवारी पहाटे करावे गावातील लक्ष्मी नारायण मंदिरातच चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ही चोरी झाली आहे. त्यामध्ये मंदिरातील चांदीची मूर्ती व दानपेटी चोरटयांनी पळवली आहे. सुमारे दिड लाखाची मूर्ती असून दानपेटीत देखील काही प्रमाणात देणगी जमा झालेली होती. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातल्या सीसीटीव्हीच्या तपासणीत दोघेजण चोरी करून जाताना दिसून आले आहेत. त्यांनी गावलतच्या तलावाकिनारी फोडलेली दानपेटी आढळून आल्याचे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितले. तर या घटनेमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक चिंतीत असल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?