अपघातग्रस्त मुलावरील उपचारासाठी जमविलेले दागिने चोरांनी पळविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 08:35 AM2021-10-12T08:35:10+5:302021-10-12T08:35:42+5:30

Crime News: अपघात झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असताना पैशासाठी सोन्याच्या दागिन्यांची जमवाजमव केली असताना त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.

The thieves snatched the jewelery collected for the treatment of the injured child | अपघातग्रस्त मुलावरील उपचारासाठी जमविलेले दागिने चोरांनी पळविले 

अपघातग्रस्त मुलावरील उपचारासाठी जमविलेले दागिने चोरांनी पळविले 

Next

जामखेड (जि. जालना) - अपघात झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असताना पैशासाठी सोन्याच्या दागिन्यांची जमवाजमव केली असताना त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे. आता उपचारासाठी पैसे कुठून आणायचे याची चिंता जामखेड (ता. अंबड ) येथील भुजंग चव्हाण यांच्या कुटुंबाला लागली आहे.   चव्हाण यांच्या मुलावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पैशांची चणचण असल्याने भुजंग यांच्या तीनही मुलींनी मिळून त्यांच्याकडील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दिले.  रविवारी ते दागिने घरात होते.
ग्रामस्थांकडून मदत
भुजंग चव्हाण यांनी मुलाच्या उपचारासाठी गहाण ठेवण्यासाठी आणलेले दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे कळताच, ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. सोमवारी ग्रामस्थांनी २७ हजार ४०० रुपयांची मदत केली आहे.

Web Title: The thieves snatched the jewelery collected for the treatment of the injured child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.