चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 02:22 PM2024-05-05T14:22:05+5:302024-05-05T14:22:23+5:30
third degree torture : याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका महिलेला थर्ड डिग्री टॉर्चर (third degree torture) दिल्याप्रकरणी महिला पोलीस सब इन्स्पेक्टरसह (Lady Sub-Inspector) अन्य तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेला अमानुषपणे मारहाण केली, त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हजरतगंजच्या दारूलशफा पोलिस चौकीशी संबंधित आहे. या एका महिलेवर चोरीचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला पकडून पोलीस ठाण्यात आणले. यानंतर पोलिसांनी महिलेला बेदम मारहाण केली.
दरम्यान, या महिलेला पोलिसांनी थर्ड डिग्री टॉर्चर दिल्याचा आरोप आहे. महिला पोलीस सब इन्स्पेक्टर आणि अन्य पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे की, महिलेला पोलीस ठाण्यात आणले आणि जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेची स्कीन निघाली. यानंतर तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडण्यात आले.
या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी याप्रकणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार, महिला पोलीस सब इन्स्पेक्टरसह अन्य तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीजीआय पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 323, 504, 506, 342 आणि 384 अंतर्गत कारवाई पोलिसांवर करण्यात आली आहे.