चार दिवसात सिंधुदुर्गात दारू वाहातूकीवर तिसरी मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 02:18 PM2021-03-27T14:18:05+5:302021-03-27T14:18:14+5:30
वाहतूक पोलीसांनी बावळट येथे दारूचा टेम्पो पकडला
सावंतवाडी : सातुळी बावळट इथे नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या ५०० दारूच्या बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून ह़ोत होती. समोर बॅरल लावून अगदी शिताफीने ही दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न दारू माफियांकडून करण्यात आला होता. मात्र, जिल्हा वाहतूक पोलीसांनी हा डाव उधळून लावत अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. यावेळी इंदोर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ लाख ४ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मध्यरात्री दरम्यान करण्यात आली आहे.
या चार दिवसात बांदा व सावंतवाडी पोलीसानतर वाहतूक पोलिसांकडून झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.
ही दारू गोव्यातून नांदेड इथे वाहतूक होत होती. असे आरोपीकडून पोलीसाना सांगण्यात आले असून दोघांना पोलीसाना ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वटकर, पोलिस अजित घाडी, वाहतूक पोलीस विलास नर, प्रशांत धुमाळे यांनी ही कारवाई केली.