थर्टी फर्स्टला पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी, भररस्त्यावर तरुणाची पिटाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 04:52 PM2022-01-02T16:52:44+5:302022-01-02T17:41:56+5:30

Crime News : उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रीचे १ वाजण्याच्या दरम्यान काही मुले रस्त्यावर उभे होते.

On Thirty-first police officer's bullying, beating of a young man on the spot | थर्टी फर्स्टला पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी, भररस्त्यावर तरुणाची पिटाई

थर्टी फर्स्टला पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी, भररस्त्यावर तरुणाची पिटाई

Next

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरात नववर्षाचे स्वागत करणाऱ्या दोन तरुणाला पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रीचे १ वाजण्याच्या दरम्यान काही मुले रस्त्यावर उभे होते. यावेळी मोटरसायकल वरून पेट्रोलींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने, जमावबंदी लागू झाली. आपापल्या घरात जा. असे त्यांना सांगून पुढे गेले. पेट्रोलींग करणारे पोलीस अधिकारी पुन्हा त्याच रस्त्याने परत आल्यावर, काही जणांनी पोलिसांकडे बघून शेरेबाजी केली. याचा राग येऊन पोलिसांनी तरुणांना मारहाण करून मध्यरात्री मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. तर तरुणांनी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर आलो, तेंव्हा मागून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण बुलेट गाडी अंगावर घालून भर रस्त्यात मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच पोलीस अधिकारी नशेत असावे, असा संशय व्यक्त करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

थर्टीफर्स्टच्या रात्री पोलीस अधिकाऱ्याच्या दबंगगिरीची चर्चा उल्हासनगरात सुरू आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी झालेला प्रकार निंदनीय असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे झालेल्या प्रकारचा तपास करून कारवाई करण्याचे संकेत दिले. कोरोनामुळे जमावबंदी लागू असतांना तरुण मध्यरात्री काय करीत होते?. त्यांना घरी जाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून उलट पोलिसा विरोधात शेरेबाजी करणे कितपत योग्य? असे प्रश्नही त्यांनी व्यक्त केले. ज्यारात्री मारहाण होऊन गुन्हा दाखल झाला. त्याच रात्री तरुणांनी व संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही? असेही पोलीस उपायुक्त मोहिते म्हणाले. झालेल्या प्रकारानंतर तरुणांनी न्यूज चॅनेल व सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याचे पोलीस उपायुक्त मोहिते म्हणाले.

 

Web Title: On Thirty-first police officer's bullying, beating of a young man on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.