चिनी व्यक्तीच्या वॉलेटमधून पैसे परत मिळवण्याची पहिलीच घटना; ३६ लाख पुन्हा घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 07:43 AM2023-07-09T07:43:27+5:302023-07-09T07:44:05+5:30

फसवणुकीतील ३६ लाख मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिले धडे, केंद्रीय गृह विभागाच्या आदेशावरून ३०० अधिकाऱ्यांना मार्गदर्शन 

This is the first case of recovering money from a Chinese person's wallet; 36 lakhs taken again | चिनी व्यक्तीच्या वॉलेटमधून पैसे परत मिळवण्याची पहिलीच घटना; ३६ लाख पुन्हा घेतले

चिनी व्यक्तीच्या वॉलेटमधून पैसे परत मिळवण्याची पहिलीच घटना; ३६ लाख पुन्हा घेतले

googlenewsNext

मीरारोड -  मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेने क्रिप्टोकरन्सीमध्ये योगेश जैन यांच्या ३६ लाखांच्या झालेल्या फसवणुकीची रक्कम चिनी व्यक्तीच्या वॉलेटमधून परत मिळवून दिल्यामुळे केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशावरून देशभरातील विविध तपास यंत्रणांच्या सुमारे ३०० अधिकाऱ्यांना सायबर शाखेने यशस्वी तपासाचे धडे ऑनलाइन कार्यशाळेद्वारे दिले.

बनावट लिंकच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेल्या फसवणुकीची रक्कम परदेशी वॉलेटमधून परत मिळवून देणारी ही देशातील पहिलीच घटना मानली जात असल्याने केंद्रीय गृहखात्याने याची दखल घेतली. मीरारोडच्या जेपी नॉर्थमध्ये राहणाऱ्या योगेश जैन यांना हाँगकाँगच्या दोघा मोबाइलधारकांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये बीटीसी इंडिया व्हॉट्सअप ग्रुपद्वारे बिटकॉइन ट्रेडिंगबद्दल टिप्स देऊन जास्त नफा कमावण्याचे आमिष दाखवले. जैन यांनी बिनान्स अँपवरून ३३ लाख ६५ हजार खर्च करून ३९ हजार ५९६ यूएसडीटी खरेदी केले व त्यांच्या सांगण्यानुसार अनोळखी लिंकद्वारे बीटीसी कॉइन ट्रेडिंग अॅपमध्ये भरले. नंतर ते अॅप व अॅमीचा नंबर बंद झाला. जैन यांनी क्रिप्टो हेल्पलाइन या अमेरिकन न्यूयॉर्क बेस कंपनीची मदत घेत पैशांचे कोणकोणत्या अॅप व वॉलेटमध्ये हस्तांतरण झाल्याचा सविस्तर अहवाल काढला.

मे २०२२ मध्ये जैन यांनी सायबर शाखेला तक्रार केल्यावर पोलिस नरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर, अंमलदार प्रवीण आव्हाड यांनी त्या अहवालाच्या आधारे तपास सुरू केला. बिनान्स व गेटआयओ या क्रिप्टो प्लॅटफॉर्मकडून सहकार्य मिळाले नाही. अमेरिकन कंपनीच्या अहवालानुसार जैन यांचे पैसे ओकेएक्सकडे गेले असल्याने सायबर शाखेने मे २०२२ मध्ये त्यांच्याशीदेखील संपर्क केला. सुरुवातीला त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. मात्र, दुसऱ्यांदा त्या कंपनीने प्रतिसाद देत ज्या चायनीज व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले होते त्याची माहिती दिली. ते पैसे गोठवल्याचे, तसेच न्यायालयाचे आदेश ठराविक दिवसांत सादर केल्यास पैसे परत करण्याची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे ओकेएक्सने त्या अमेरिकन कंपनीचा ट्रेस अहवाल मान्य केला. 

Web Title: This is the first case of recovering money from a Chinese person's wallet; 36 lakhs taken again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.