सीबीआयकडून शोविक, नीरजसह पाचजणांकडे कसून चौकशी, आता रियाचा नंबर लागू शकतो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 11:14 PM2020-08-27T23:14:44+5:302020-08-27T23:15:42+5:30
Sushant Singh Rajput : सुशांतचे बहिणीशी असलेले संबंध, ब्रेकअपपासून व्यवसायिक भागीदारी आणि आत्महत्येच्या घटनेपर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या चौकशीचा धडाका कायम असून गुरुवारी या प्रकरणातील मुख्य संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्यासह पाच जणांकडून कसून चौकशी केली. सुशांतचे बहिणीशी असलेले संबंध, ब्रेकअपपासून व्यवसायिक भागीदारी आणि आत्महत्येच्या घटनेपर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे झाडाझडती सुरु होती.
दरम्यान, रियाविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याने तिला शुक्रवारी ताब्यात घेतले जाऊ शकते, असे सूत्राकडून सांगण्यात आले. शोविकशिवाय सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी, त्याचा माजी मॅनेजर रजत मेवानी आणि घरातील नोकर नीरज सिंग यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. शोविक चक्रवर्ती सकाळी दहाच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहचला. त्याच सुमारास अन्य चोघेही आले. त्यांना स्वतंत्रपणे बसवून अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. सुशांत आणि त्याच्या संबंधी प्रत्येक गोष्टीची सविस्तर विचारणा करण्यात येत होती. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती.
आठ जूनला कडाक्याचे भांडण
रियाने आठ जूनला सुशांतचे घर सोडले, त्यावेळी दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते.त्याची रूम आतून लॉक असल्याने केवळ आरडाओरड ऐकु येत होता, रिया घरातून बाहेर जाताना तिचे डोळे सुजले होते, असा जबाब त्याचा नोकर नीरज सिंगने दिला असल्याचे समजते.
रियाने जाण्यापूर्वी 8 हार्ड डिस्क डिलीट केल्या
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने रिया याने घरातून जाण्यापूर्वी रूममधील 8 हार्ड डिस्क नष्ट करून टाकल्याचे अधिकाऱ्यांना सडांगितले आहे. नष्ट केलेल्या डेस्कमध्ये त्याचे विविध वेळी काढलेले एकत्र फोटो, व्हिडीओ आणि अन्य बाबी होत्या असे त्याने सांगितल्याचे समजते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?