२ हजाराच्या नोटाच्या देण्याच्या बहाण्याने ८० लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 10:06 PM2020-03-02T22:06:37+5:302020-03-02T22:08:06+5:30
आंतरराज्य टोळीला अटक; गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
मुंबई : दोन हजार रूपयाच्या नोटा अर्ध्या किंमती देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुबाडणाºया एका आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. गोरेगाव (पूर्व) येथील हॉटेल वेस्ट इनमध्ये छापा टाकून तिघांना अटक केली.
मुंबईसह कोलकत्ता, बंगळूर,आग्रा, दिल्ली याठिकाणी अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे. गेल्या दोन महिन्यापासून हे रॅकेट मुंबई उपनगरात कार्यरत होते. त्यांचे आणखी काही साथीदार फरारी असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
विमानतळाशेजारील हॉटेल ‘वेस्ट इन’मध्ये शनिवारी भारतीय चलनातील दोन हजार रुपयाच्या नोटा निम्मा किंमतीत देण्याच्या बहाण्याने दक्षिण मुंबईतील एका व्यापाºयाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-२च्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला बोलावून विचारणा केली असता त्याने सांगितले की, काही दिवसापूर्वी एका आरोपीने हॉटेलमध्ये बोलावून एकाची ओळख करुन दिलेल्या एका आरोपीने केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखविले. २ हजार रुपयाच्या सेंकड सिरीज असलेल्या नोटा आम्हाला मिळतात, त्या निम्या किंमतीत देवू , असे सांगून त्याच्या दोन हजाराच्या प्रत्येकी ५ नोटा देत त्याबदल्यात ५०० व शंभर रुपयाच्या नोटा घेतल्या होत्या, त्याने घेतलेल्या नोटा बाजारात खपल्याने त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर अशा प्रकारच्या १ कोटी ६० लाख रुपये मूल्याच्या २ हजाराच्या नोटा निम्या किंमतीत घेण्याची त्याने तयारी दर्शविली. त्यानुसार ५०० व १०० रूपयाच्या चलनी नोटा असलेली ८० लाख रुपये घेवून तो शनिवारी हॉटेलमध्ये पुन्हा गेला. त्यावेळी एकाने त्याच्याकडील नोटा घेत आमच्या एका सहकाºयाला एटीएसच्या पोलिसांनी पकडले आहे, त्यामुळे तू ही बॅँग घेवून लवकर निघून जा, असे सांगितले. त्याने बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये २ हजाराच्या नोटच्या कागदाची बंडले आढळून आली. त्यानुसार पथकाने सोमवारी सकाळी त्या हॉटेलवर छापा टाकून तिघांना अटक केली.
महाराष्टÑ, कर्नाटक, गुजरात, दिल्लीमध्ये त्यांनी अशा प्रकारने अनेकांना लुबाडले असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सागिंतले. त्यांच्याकडून मुंबई व परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.