मोबाईलचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:46 IST2018-08-03T16:45:35+5:302018-08-03T16:46:30+5:30
पोलिसांनी राहुल शाक्य,कुलप सिंग आणि आशिष कुमार या त्रिकुटाच्या आवळल्या मुसक्या

मोबाईलचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास
ठाणे - मोबाईलचे गोडाऊन फोडून ८६ लाखांचे सामान पळवणाऱ्या परप्रांतीय त्रिकूटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल शाक्य (वय -२५), कुलप सिंग (वय - २५) , आशीष कुमार (वय - २७ ) अशी या त्रिकूटाची नावे असून ते उत्तर प्रदेशात राहणारे आहेत.
नुकतेच पडघा कल्याण रस्त्यालगत असणाऱ्या रिलायन्स लॉजेस्टिक पार्क वाशेरे येथील मोबाईलचे गोडाऊन फोडण्यात आले होते. यामधून वेगवेगळ्या कंपनीचे आयफोन, मोबाईल, लॅपटॉप, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, कॅमेरा असा ८६ लाख रुपयांचा माल चोरीस गेला होता. या चोरीचा पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे, उपनिरीक्षक विजय सुर्वे, पोलीस नाईक विशे, जगदाळे, हरणे, दांडकर यांच्या पथकाने छडा लावला. पथकाने एका कारसह आरोपी राहूल शाक्य , कुलप सिंग, आशीष कुमार यांना अटक करुन चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.