जळगावात दोन टेम्पो भरुन मांजा जप्त; सहा गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:20 PM2021-01-04T23:20:35+5:302021-01-04T23:22:27+5:30
Crime News : शनी पेठ पोलीस ठाण्यात किरण भगवान राठोड (५२,रा.जोशी पेठ),संदीप श्यामकांत साकला (३७,रा.जोशी पेठ),कुणाल नंदकिशोर साखला (२८,रा.जोशी पेठ) व रितीक पुरन खिच्ची (१९,रा.जोशी पेठ) यांच्याविरुध्द तर भरत ईश्वरलाल छत्रीवाला (५४,रा.बळीराम पेठ) यांच्याविरुध्द शहर पोलिसात तर प्रदीप विजय भाटे (रा.गणेश नगर) याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : अत्यंत घातक व जीव घेणा असलेल्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या शहरातील सहा दुकानांवर सोमवारी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एकाचवेळी छापा टाकण्यात आला. त्यात १ लाख ७८ हजार १९४ रुपये किमतीचा दोन मालवाहू टेम्पो भरुन मांजा पोलिसांनी जप्त केला असून स्वतंत्र सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मकर संक्रातींच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर होतो. मांजा नायलॉनचा असल्यामुळे गळ्यात व शरीरात अडकून अनेकांचा त्यात जीव गेला आहे. गेल्या आठवड्यात नाशिक शहरात रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकून जीव गेला होता. अत्यंत घातक असलेल्या या मांजाच्या विक्रीला शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही शहर व जिल्ह्यात मांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सोमवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना धाडसत्र राबविण्याचे आदेश सोमवारी दिले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पथकाने दुपारी शहरातील पतंग गल्ली, जोशी पेठ, शनी पेठ, गणेश नगर व बळीराम पेठेत धाड टाकली..शनी पेठ पोलीस ठाण्यात किरण भगवान राठोड (५२,रा.जोशी पेठ),संदीप श्यामकांत साकला (३७,रा.जोशी पेठ),कुणाल नंदकिशोर साखला (२८,रा.जोशी पेठ) व रितीक पुरन खिच्ची (१९,रा.जोशी पेठ) यांच्याविरुध्द तर भरत ईश्वरलाल छत्रीवाला (५४,रा.बळीराम पेठ) यांच्याविरुध्द शहर पोलिसात तर प्रदीप विजय भाटे (रा.गणेश नगर) याच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.